अनाया बांगरचे मारिझान कॅपच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर, म्हणाली… ‘स्वतःचे ज्ञान वाढवा’

मुंबई : ऑस्ट्रेलियात कम्युनिटी (स्थानिक) स्तरावर खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनाया बांगर आपला क्रिकेटचा प्रवास नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजूनही तिला संघ मिळालेला नसला, तरी तेथे खेळून आणि चांगली कामगिरी करून पुढील वर्षी ‘वुमेन्स बिग बॅश लीग’ (WBBL) मध्ये संधी मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास मदत होईल, अशी ट्रान्सजेंडर अनायाला आशा आहे. मात्र, तिच्या या महत्त्वाकांक्षेला सहानभूतीसोबतच टीकेचाही सामना करावा लागत आहे. दक्षिण आफ्रिकेची दिग्गज खेळाडू मारिझान कॅप हिने अनायाच्या WBBL मधील संधीच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित करत शुक्रवारी याला “पूर्णपणे हास्यास्पद” (absolutely ridiculous) म्हटले.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचा एक अहवाल तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅपने लिहिले, “हे पूर्णपणे हास्यास्पद आहे. याला परवानगी दिली जाऊ नये.” ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमध्ये खेळण्याच्या तिच्या प्रयत्नांवर होणाऱ्या टीकेला, ज्यामध्ये मारिझान कॅपच्या टिप्पण्यांचाही समावेश आहे, अनायाने प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, तिच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी या विषयावर स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे. तसेच तिने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष वेधले, ज्यांचे ती पूर्णपणे पालन करत आहे.

“मला वाटते की ज्यांना याविरोधात आवाज उठवायचा आहे, त्यांनी प्रत्यक्षात या विषयावर स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे. मी आधीच कोणताच अयोग्य फायदा न मिळण्याबाबत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत आवश्यक ती माहिती दिली आहे. जरी कोणाचे वैयक्तिक मत अशा प्रकारचे असेल, तर त्यांनी जाऊन स्वतःचे ज्ञान वाढवावे अशी मी आशा करते,” असे ती म्हणाली. जर तिच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी निर्धारित मर्यादेत राहिली, तर अनायाला पुढील वर्षी मार्चमध्ये WBBL मध्ये खेळण्याची आशा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल २५ वर्षीय अनायाने आपली निराशा व्यक्त केली. संवादाचा अभाव हृदयद्रावक असल्याचे सांगत तिने बीसीसीआयला विनंती केली की, तिच्या अनुभवाचा वापर करून भारतात महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर सहभागाबाबत धोरण आखण्यासाठी सुरुवात करावी. मला माहित होते की लिंग बदलाच्या (transitioning) प्रक्रियेमुळे मला क्रिकेटपासून दूर जावे लागेल… मला आशा आहे की बीसीसीआय याबाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल आणि या विषयाशी संबंधित धोरणे तयार करण्याचा प्रयत्न करेल, कारण मी भारतातील अशी पहिलीच केस आहे. माझ्या संपूर्ण प्रवासातील माझे अनुभव आणि निष्कर्ष मांडण्यासाठी, तसेच आपल्या देशासाठी आणि भविष्यात महिला खेळांसाठी काय सर्वोत्तम ठरेल हे सांगण्यासाठी या टीमचा भाग होण्यास मला आनंद होईल,” असे ती म्हणाली.

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...