कोल्हापूर : प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
मतदाराचा जन्मदिनांकाचा कालावधी विचारात घेवून जोडावयाच्या विविध पुराव्याच्या कागदपत्रांचा तपशिल नमूद असल्याची तसेच त्यापैकी त्यांचेकडे उपलब्ध पुराव्याची कागदपत्राची छायाप्रत स्वसाक्षाकिंत (Self – Attested) करुन गणना प्रपत्रासोबत जोडणे आवश्यक असल्याची बाब मतदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली होती. तसेच त्यानुसार मतदारानी भरलेल्या व कागदपत्रे जोडलेल्या गणना प्रपत्रातील तपशिलाची सन २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी करुन गणना प्रपत्रे जमा करुन घेण्यात आलेली आहेत.

प्रत्येक BLO यांना नमुना क्रमांक. ६ चे ३०. नमुना क्रमांक. ७ चे १० व नमुना क्रमांक. ८ चे १५ कोरे गणना प्रपत्रांचे (Enumeration Form) वाटपाचे कामकाज पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच BLO यांनी आवश्यकतेनुसार सदरचे फॉर्म्स मतदारांकडून भरुन घेतलेले आहेत. “नातेवाईक” च्या मागील SIR 2002 च्या तपशील शी स्वतःला जोडू शकतो असे नमूद असून “नातेवाईक” या शब्दाचा अर्थ * रक्ताच्या नात्यातील मतदार (जसे की, आई, वडील, आज्जी, आजोबा) असा आहे. तरी प्रत्येक मतदार आपल्या रक्ताच्या नात्यातील मतदार यांचा मागील SIR 2002 चा तपशीलाचा संदर्भ देऊन दावे व हरकती कालावधीमध्ये आपले नाव मतदार यादीत निश्चित करू शकतात.

प्रत्येक मतदार दावे व हरकती आपले सबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय या ठिकाणी कार्यालयीन वेळेत देवून पोहोच घेऊ शकतात. भारत निवडणूक आयोगाने नमूद केलेली १२ कागदपत्रे व याव्यतिरिकत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची खातरजमा व दाव्याची पुष्टी होईल, अशी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या पुराव्याची कागदपत्रे, मतदार दावे व हरकती कालावधीत म्हणजेच दि. 30 सप्टेंबर अखेर सादर करू शकतात.

तरी, प्रशासनाच्यावतीने सर्व कोल्हापूर जिल्हयातील मतदार जनतेला आवाहन / विनंती करण्यात येते की, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असुन सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्या बाबतची तपासणी, मतदान केंद्राच्या ठिकाणी तसेच Voters.eci.gov.in या संकेतस्थळावरुन Online स्वरुपात करावी. तसेच नमुना क्रमांक ६ (प्रारूप मतदार यादीत आपले नाव नसल्यास किंवा आपण नवमतदार असल्यास घोषणापत्रासह भरावा. ०१ ऑक्टोबर, २०२६ या अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार तसेच प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेल्या पात्र व्यक्ती यांनी भरवा. नमुना क्रमांक. ७ मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी मृत किंवा इतर कारणांसाठी, नमुना क्रमांक. ८ मतदार यादीतील तपशील दुरुस्त्या तसेच दिव्यांगत्वाची नॉप करण्यासाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलात दुरुस्ती/दिव्यांग नोंद यासाठी इतर राज्यातून स्थलांतरीत मतदारांसाठी भरण्यात यावा. यासाठी http://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ECINET मोबाईल अॅपचा वापर करावा तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत किंवा BLO कडे देण्यात यावा.

तरी कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी प्रारुप मतदारयादीमध्ये ते सर्वसाधारण वास्तव्य करीत असलेल्या पत्यावर त्यांचे नाव समाविष्ट असल्याबाबत खात्री करावी तसेच “कोणताही पात्र उमेदवार वंचित राहणार नाही, कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही” याची काळजी घ्यावी असे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.






