गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

कोल्हापूर : जिल्हयामध्ये गणेश उत्सव हा सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. या गणेश उत्सव कालावधीत गणेश मंडळ, तालीम संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी मिरवणुका पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात आबालवृध्द, महिला, मुलींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सदर मिरवणुकी दरम्यान ड्रोनव्दारे शुटींग करतेवेळी गणपती मिरवणूक पाहण्यास येणारे लोक ड्रोनच्या दिशेने आपले शुटींग व्हावे या उद्देशाने एकाच ठिकाणी थांबून बराच वेळ रेंगाळतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर चेंगराचेंगरी अथवा धक्काबुक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये, जिल्हयामध्ये गणेश उत्सव कालावधीत गणेश मंडळ, तालीम संस्था यांच्याकडून गणपती मुर्तीचे आगमन व विसर्जना दरम्यान काढण्यात येणा-या मिरवणुकीच्या वेळी ड्रोन कॅमेरा उड्डाण व चित्रीकरणास 14 ते 26 सप्टेंबर रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रतिबंध (बंदी) केला आहे.

सदरचा आदेश कायद्या व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी व त्यांना नेमून दिलेल्या कामकाजासाठी हातळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घ्यावे : उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण

प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घ्यावे : उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण

कोल्हापूर : प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे. मतदाराचा जन्मदिनांकाचा कालावधी विचारात घेवून जोडावयाच्या विविध पुराव्याच्या कागदपत्रांचा तपशिल नमूद असल्याची तसेच...

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च दिलासा; श्रीराम दूध संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च दिलासा; श्रीराम दूध संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

संस्थांचे मतदार यादीतील स्थान कायम कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या ४९२ अवसायनातील दूध संस्थांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्रीराम दूध संस्थेने या ४९२ संस्थांच्या पात्रतेविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने...

जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरीय नेत्यांना नाहीत; धनंजय महाडिकांचा मुश्रीफांना अप्रत्यक्ष इशारा

जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरीय नेत्यांना नाहीत; धनंजय महाडिकांचा मुश्रीफांना अप्रत्यक्ष इशारा

‘गोकुळ’मधील महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीत कोणते पक्ष एकत्र राहणार आणि जागावाटप कसे होणार, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील....

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) या सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर येथील बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे...

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

कुटुंबीयांसह भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी आज श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, मंगलमय वातावरण आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचे...

गणेशोत्सवाचे मंगलपर्व आजपासून; करवीरनगरीत उत्साहाला उधाण

गणेशोत्सवाचे मंगलपर्व आजपासून; करवीरनगरीत उत्साहाला उधाण

सर्वत्र भक्तिमय वातावरण; घरोघरी सजावट आणि पूजेची तयारी, सार्वजनिक मंडळेही सज्ज कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, आज सोमवारी घरोघरी गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करवीरनगरी...