गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च दिलासा; श्रीराम दूध संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

संस्थांचे मतदार यादीतील स्थान कायम

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या ४९२ अवसायनातील दूध संस्थांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्रीराम दूध संस्थेने या ४९२ संस्थांच्या पात्रतेविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे संबंधित सर्व ४९२ दूध संस्थांचे गोकुळच्या अंतिम मतदार यादीतील स्थान कायम राहिले आहे.सुनावणीवेळी आमदार सतेज पाटील गटाकडून दूध संस्थांच्या वतीने ॲड. आनंदा लांडगे यांनी बाजू मांडली.

गोकुळच्या अवसायनातील ४९२ दूध संस्थांना कोल्हापूर सर्किट बेंचने पात्र ठरविले होते. त्यानंतर विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनीही या संस्थांना पात्र ठरविल्याने त्यांचा गोकुळच्या मतदार यादीत समावेश करण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देत इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील ४९२ संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले होते.

या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने श्रीराम दूध संस्थेची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ४९२ अवसायनातील दूध संस्थांचा मतदार यादीतील समावेश कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोकुळ निवडणुकीतील ४९२ संस्थांच्या पात्रतेचा न्यायालयीन वाद सध्या निकाली निघाला असून, संबंधित संस्थांना मतदानाचा अधिकार कायम राहिला आहे. श्री. राम सहकारी दूध संस्था, इस्पुर्ली व श्री काडसिद्धेश्वर सहकारी दूध संस्था, कोगील यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विकास सिंग, ॲड. गोपाल शंकर नारायण यांनी बाजू मांडली.

प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घ्यावे : उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण

प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घ्यावे : उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण

कोल्हापूर : प्रारुप यादीमध्ये नाव असल्याबाबत खातरजमा करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे. मतदाराचा जन्मदिनांकाचा कालावधी विचारात घेवून जोडावयाच्या विविध पुराव्याच्या कागदपत्रांचा तपशिल नमूद असल्याची तसेच...

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

कोल्हापूर : जिल्हयामध्ये गणेश उत्सव हा सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. या गणेश उत्सव कालावधीत गणेश मंडळ, तालीम संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी मिरवणुका पाहण्याकरीता...

जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरीय नेत्यांना नाहीत; धनंजय महाडिकांचा मुश्रीफांना अप्रत्यक्ष इशारा

जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरीय नेत्यांना नाहीत; धनंजय महाडिकांचा मुश्रीफांना अप्रत्यक्ष इशारा

‘गोकुळ’मधील महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीत कोणते पक्ष एकत्र राहणार आणि जागावाटप कसे होणार, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील....

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) या सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर येथील बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे...

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

कुटुंबीयांसह भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी आज श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, मंगलमय वातावरण आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचे...

गणेशोत्सवाचे मंगलपर्व आजपासून; करवीरनगरीत उत्साहाला उधाण

गणेशोत्सवाचे मंगलपर्व आजपासून; करवीरनगरीत उत्साहाला उधाण

सर्वत्र भक्तिमय वातावरण; घरोघरी सजावट आणि पूजेची तयारी, सार्वजनिक मंडळेही सज्ज कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, आज सोमवारी घरोघरी गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करवीरनगरी...