‘मिस्टर सिंग’ जाहिरातीवरून अमेरिकेत वाद; टीकेनंतर ट्रम्प प्रशासनाने जाहिरात हटवली

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘स्व-निर्वासन’ मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध केलेली एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर हटवली आहे. या जाहिरातीमधून शीख समुदायाला लक्ष्य करून कथित वांशिक भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. भारतीय-अमेरिकन संघटना तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेत तिला ‘वांशिक प्रचार’ असल्याचे म्हटले.

Amaron

Amaron

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (DHS) गुरुवारी ही जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून हटवली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीत दाढी असलेल्या एका व्यक्तीचे छायाचित्र दाखवण्यात आले होते. त्यावर ‘मिस्टर सिंग, आमच्या रस्त्यांवरून निघा, तुम्हाला वाहन चालवता येत नाही’ अशा आशयाचे वाक्य लिहिले होते. अमेरिकेतील परवान्याशिवाय व्यावसायिक वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात DHS कडून सुरू असलेल्या मोहिमेचा हा भाग होता. मात्र, ‘सिंग’ हे आडनाव आणि जाहिरातीतील व्यक्तीचे स्वरूप यामुळे शीख समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला.

जाहिरात हटवल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, DHS ने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील आपली भूमिका कायम ठेवत गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींबाबतही ‘एक्स’वर पोस्ट करणे सुरू ठेवले. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी जाहिरातीचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्रम्प प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे अत्यंत घृणास्पद आहे. ट्रम्प सरकार शीख समुदायाला लक्ष्य करणारा वांशिक प्रचार करत आहे.”

यानंतर DHS ने ट्रकचालक हरजिंदर सिंग याच्याशी संबंधित आणखी एक पोस्ट केली. बेकायदेशीर ‘यू-टर्न’ घेतल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर हरजिंदर सिंगला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरला प्रत्युत्तर देताना DHS ने म्हटले, “गॅव्हिन, तुम्हीच त्याला (हरजिंदर सिंग) व्यावसायिक चालक परवाना (CDL) दिला आणि त्यानंतर त्याने ट्रकच्या धडकेत तीन जणांचा जीव घेतला.” कॅलिफोर्नियाचे सिनेटर अॅडम शिफ यांनीही ट्रम्प प्रशासनावर टीका केली. DHS ची जाहिरात मोहीम ‘द्वेषपूर्ण, लज्जास्पद आणि अमेरिकन मूल्यांच्या विरोधात’ असल्याचे त्यांनी म्हटले.

शिफ यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “प्रशासन आणि DHS आपल्या स्पष्ट पूर्वग्रहांना लपवण्याचाही प्रयत्न करत नाहीत. लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या दिसण्यावरून लाखो अमेरिकन नागरिकांवर संशय घेतला जात आहे. यावेळी शीख समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे.” हिंदू अमेरिकन फाउंडेशन, सिख कोअॅलिशन, हिंदूअॅक्शन आणि कोअॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका यांसह अनेक संघटनांनीही या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहिरातीला ‘अमेरिकन मूल्यांच्या विरोधातील आणि वांशिक भेदभाव करणारी’ असे संबोधले.

हिंदू अमेरिकन फाउंडेशनने म्हटले की, “सिंग हे हिंदू आहेत, ते शीख आहेत, ते अमेरिकन आहेत आणि ते वाहन चालवतात. DHS कडून करण्यात येत असलेले वांशिक, अमेरिकन मूल्यांच्या विरोधातील आणि भारतीयांविरोधातील प्रोफाइलिंग तसेच ट्रोलिंग हे अत्यंत गंभीर आहे.” या संघटनेने अमेरिकेच्या सहाय्यक अॅटर्नी जनरल हरमीत के. धिल्लों आणि FBI संचालक काश पटेल यांना टॅग करत या पोस्टची चौकशी करण्याची मागणी केली. फेडरल एजन्सीची ही ‘भेदभावपूर्ण’ पोस्ट केवळ राजकीय संदेशापुरती मर्यादित नसल्याचेही संघटनेने म्हटले.

दरम्यान, DHS कडून ‘CBP Home’ कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मोहीम राबवली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत बेकायदेशीररीत्या किंवा कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या स्थलांतरितांना स्वेच्छेने अमेरिका सोडण्याची इच्छा नोंदवता येते. DHS च्या माहितीनुसार, स्व-निर्वासनासाठी नोंदणी करणाऱ्या पात्र स्थलांतरितांना प्रवासासाठी मदत तसेच २,६०० अमेरिकी डॉलरपर्यंतचा एक्झिट बोनस मिळू शकतो.

इम्रान खान तुरुंगात, माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचा अब्जाधीशासोबत विवाह; फोटो व्हायरल

इम्रान खान तुरुंगात, माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचा अब्जाधीशासोबत विवाह; फोटो व्हायरल

कॅमेरॉन ओ’रायली यांच्यासोबत विवाह; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना त्यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. जेमिमा यांनी...

भारत-रशिया मैत्री आणखी दृढ होणार; व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

भारत-रशिया मैत्री आणखी दृढ होणार; व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासोबतच दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सहमती झाली. सध्या सुमारे ६५ अब्ज अमेरिकी डॉलर असलेली दोन्ही देशांमधील...

‘कुरापत केली तर घरात घुसू’; PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

‘कुरापत केली तर घरात घुसू’; PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC)च्या शताब्दी महोत्सवाला उपस्थिती लावली. SRCCच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या औचित्याने...

न्यूयॉर्कमधून मोहन भागवतांचा NRI भारतीयांना मोठा संदेश; म्हणाले, “कर्मभूमीशी एकनिष्ठ राहा!”

न्यूयॉर्कमधून मोहन भागवतांचा NRI भारतीयांना मोठा संदेश; म्हणाले, “कर्मभूमीशी एकनिष्ठ राहा!”

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्हीप्रती आपली कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले आहे. आपण ज्या देशात राहतो, तेथील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतानाच भारताशी असलेले...

नेपाळमध्ये पुराचा कहर; ९८ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता; भारताकडून मदत, यूपी-बिहारमध्ये NDRF सतर्क

नेपाळमध्ये पुराचा कहर; ९८ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता; भारताकडून मदत, यूपी-बिहारमध्ये NDRF सतर्क

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे  मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नेपाळमधील पुरातील मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला असल्याचे वृत्तसंस्था रॉयटर्सने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे. तर तिबेटमध्येही तीन जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक...

ट्रम्प यांना कॅनडाचा दणका; अमेरिकन वस्तूंवर लादले १५ ते ५० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क

ट्रम्प यांना कॅनडाचा दणका; अमेरिकन वस्तूंवर लादले १५ ते ५० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क

कॅनडा-अमेरिका व्यापार तणाव वाढला; ७०० अमेरिकी उत्पादनांवर शुल्क, २७.६ अब्ज कॅनेडियन डॉलर्सच्या शुल्काची घोषणा ओटावा : कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या विविध...