भारत-रशिया मैत्री आणखी दृढ होणार; व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासोबतच दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सहमती झाली. सध्या सुमारे ६५ अब्ज अमेरिकी डॉलर असलेली दोन्ही देशांमधील व्यापार उलाढाल २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आलेले पुतिन दिल्लीत दाखल झाल्यानंतर काही तासांतच मोदी आणि पुतिन यांची भेट झाली. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत संरक्षण, ऊर्जा यासह विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली. भारतीय निर्यातदारांना रशियामध्ये अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणीही पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांच्याकडे केल्याचे समजते.

भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा

पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सागरी व्यापार आणि भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दाही मोदी यांनी पुतिन यांच्यासमोर उपस्थित केला. या संघर्षांमुळे सागरी व्यापारावर परिणाम होत असून भारतीय नाविकांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Amaron

Amaron

पुतिन यांना तिरुक्कुरलची रशियन प्रत भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना महान तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुक्कुरल’ या ग्रंथाची रशियन भाषेतील अनुवादित प्रत भेट दिली. दरम्यान, ब्रिक्स समूह हा कोणत्याही देशाच्या विरोधात नसून रशिया संपूर्ण जगासोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.

स्थानिक चलनांमधील व्यापाराला प्रोत्साहन

ब्रिक्स देशांमधील व्यापारासाठी स्थानिक चलनांचा वापर वाढविण्याच्या दिशेने अधिक ठोस पावले उचलण्याचे आवाहन इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी केले. ब्रिक्स देशांसाठी इराणची संसाधने महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

युक्रेन युद्धावर भारताची भूमिका कायम

युक्रेनमधील संघर्ष समाप्त करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा राहील, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चेदरम्यान केला.

‘भारताच्या प्रगतीने विरोधक अस्वस्थ’ : भाजप

दरम्यान, भारत वेगाने प्रगती करत असल्याचे विरोधकांना पचत नसल्याची टीका भाजपने केली. त्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून ब्रिक्स शिखर परिषदेबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला.

 

इम्रान खान तुरुंगात, माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचा अब्जाधीशासोबत विवाह; फोटो व्हायरल

इम्रान खान तुरुंगात, माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचा अब्जाधीशासोबत विवाह; फोटो व्हायरल

कॅमेरॉन ओ’रायली यांच्यासोबत विवाह; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना त्यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. जेमिमा यांनी...

‘मिस्टर सिंग’ जाहिरातीवरून अमेरिकेत वाद; टीकेनंतर ट्रम्प प्रशासनाने जाहिरात हटवली

‘मिस्टर सिंग’ जाहिरातीवरून अमेरिकेत वाद; टीकेनंतर ट्रम्प प्रशासनाने जाहिरात हटवली

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘स्व-निर्वासन’ मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध केलेली एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर हटवली आहे. या जाहिरातीमधून शीख समुदायाला लक्ष्य करून कथित वांशिक भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. भारतीय-अमेरिकन संघटना तसेच...

‘कुरापत केली तर घरात घुसू’; PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

‘कुरापत केली तर घरात घुसू’; PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC)च्या शताब्दी महोत्सवाला उपस्थिती लावली. SRCCच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या औचित्याने...

न्यूयॉर्कमधून मोहन भागवतांचा NRI भारतीयांना मोठा संदेश; म्हणाले, “कर्मभूमीशी एकनिष्ठ राहा!”

न्यूयॉर्कमधून मोहन भागवतांचा NRI भारतीयांना मोठा संदेश; म्हणाले, “कर्मभूमीशी एकनिष्ठ राहा!”

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्हीप्रती आपली कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले आहे. आपण ज्या देशात राहतो, तेथील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतानाच भारताशी असलेले...

नेपाळमध्ये पुराचा कहर; ९८ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता; भारताकडून मदत, यूपी-बिहारमध्ये NDRF सतर्क

नेपाळमध्ये पुराचा कहर; ९८ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता; भारताकडून मदत, यूपी-बिहारमध्ये NDRF सतर्क

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे  मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नेपाळमधील पुरातील मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला असल्याचे वृत्तसंस्था रॉयटर्सने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे. तर तिबेटमध्येही तीन जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक...

ट्रम्प यांना कॅनडाचा दणका; अमेरिकन वस्तूंवर लादले १५ ते ५० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क

ट्रम्प यांना कॅनडाचा दणका; अमेरिकन वस्तूंवर लादले १५ ते ५० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क

कॅनडा-अमेरिका व्यापार तणाव वाढला; ७०० अमेरिकी उत्पादनांवर शुल्क, २७.६ अब्ज कॅनेडियन डॉलर्सच्या शुल्काची घोषणा ओटावा : कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या विविध...