युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट

 २०२७ च्या प्रारंभी पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित

बेंगळुरू : भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी संभाजीराजे यांनी कोल्हापूर – पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. इतिहासातील हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याबाबत, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार, उद्योग, गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रांना चालना देण्याबाबत या बैठकीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.

संभाजीराजे यांनी प्रधानमंत्री टस्क यांना कोल्हापूर येथे पोलंड मधील उद्योगांचे औद्योगिक हब उभारण्याबाबत आवाहन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेल्या नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी विशेष आस्था व्यक्त केली. मानवता, सहिष्णुता आणि सेवाभाव या मूल्यांचे जतन करणाऱ्या छत्रपती घराण्याच्या योगदानाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. संकटकाळात पोलिश नागरिकांना मिळालेला हा आधार भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्रीचा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे.

या भेटीदरम्यान पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी २०२७ च्या प्रारंभी कोल्हापूरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. प्रस्तावित ‘वळीवडे म्युझियम फॉर ह्युमॅनिटी अँड पीस’च्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौरा करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. हा संभाव्य दौरा भारत-पोलंड संबंधांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सहकार्याला अधिक चालना देणारा ठरू शकतो.

भारत आणि पोलंड यांच्यातील संबंधांना केवळ ऐतिहासिक मैत्रीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना व्यापक सहकार्याची जोड देण्याच्या दृष्टीनेही या भेटीला महत्त्व आहे. वळीवडेच्या ऐतिहासिक वारशातून निर्माण झालेला स्नेहबंध हा भूतकाळातील मानवतावादी कार्याचा गौरवशाली ठेवा असून, भविष्यातील सहकार्याचा भक्कम आधारही आहे. या नात्याच्या बळावर व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

प्रस्तावित ‘वळीवडे म्युझियम फॉर ह्युमॅनिटी अँड पीस’ हे मानवता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे कायमस्वरूपी प्रतीक ठरणार आहे. इतिहासातील या प्रेरणादायी अध्यायाचे जतन करण्याबरोबरच, भावी पिढ्यांना मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देणे आणि भारत-पोलंड यांच्यातील परस्पर विश्वास व सांस्कृतिक जवळीक अधिक दृढ करणे, ही या संग्रहालयामागील व्यापक संकल्पना आहे. त्यामुळे हे संग्रहालय दोन्ही देशांमधील ऐतिहासिक नात्याला भविष्यकालीन सहकार्याची जोड देणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल. या भेटीदरम्यान पोलंडच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रतिनिधी आणि भारतातील पोलंडचे राजदूत, पोलंडमधील भारताचे राजदूत उपस्थित होते.

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशाच्या आत्म्यावर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ‘इंडिया’ आघाडीतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या...

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले...

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

नवी दिल्ली : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही सैन्यदलांसाठी २.१२ लाख कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रां आणि आधुनिक लष्करी उपकरणांच्या खरेदी प्रस्तावांना सोमवारी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली....

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांनी महाराष्ट्रातील प्रारूप मतदारयादीतून तब्बल तीन कोटी मतदारांची नावे हटवण्यात...

पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘बाप’ वक्तव्याने वाद; भाजपचा जोरदार पलटवार

पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘बाप’ वक्तव्याने वाद; भाजपचा जोरदार पलटवार

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पाटणा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘मोदी का बाप भी जायेगा’ (मोदींच्या वडिलांचाही पराभव होईल) असे वक्तव्य खरगे यांनी केल्याचा...

पंतप्रधान मोदींच्या संभाव्य उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दसरा उत्सवासाठी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधान मोदींच्या संभाव्य उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दसरा उत्सवासाठी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था

२,५०० सुरक्षा कर्मचारी तैनात; ड्रोनद्वारे नजर, वाहतुकीत बदल आणि निर्बंध लागू नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील दसरा उत्सवाला उपस्थित राहण्याची आणि रावण दहन कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व दिल्लीतील आयपी...