डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे हिचा कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, वास्तुशास्त्र हे केवळ इमारतींच्या रचनेपुरते मर्यादित नसून समाजाच्या गरजा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनशैली यांचा विचार करणारे व्यापक क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला तयार करावे. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील बदलत्या संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि वास्तुविशारद म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती त्यानी दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन त्यानी केले.

प्राचार्य डॉ. संजय एस. पवार म्हणाले, महाविद्यालयाला मिळालेले १०० टक्के प्रवेशाचे यश हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थी आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांना नवी दिशा द्यावी. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक उपक्रम, विभागातील सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यानंतर नव्या विद्यार्थ्यांना स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील विविध विभाग, प्रयोगशाळा व शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती देण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेश विभागप्रमुख आर. जी. बेन्नी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रवेश समन्वयक प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. मनजीत जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा : डॉ. आर. के. शर्मा

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा : डॉ. आर. के. शर्मा

डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न कोल्हापूर : विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती...

‘आय ट्रिपल ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा

‘आय ट्रिपल ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा

-डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंगमध्ये विद्यार्थी शाखेचा शुभारंभ कोल्हापूर :  तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर...

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

कसबा बावडा : येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा,...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  कोल्हापूर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “तणाव...

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

-'स्कूल ऑफ लॉ' ला मंजुरी -कायदा क्षेत्रातील विविध संधींची द्वारे विद्यार्थ्यांसाठी खुली -अनुभवी विधीज्ञांचे मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन कोल्हापूर : कायदा क्षेत्रातील बदलत्या गरजा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि जागतिक स्तरावरील संधी लक्षात घेऊन तळसंदे येथील डी. वाय....

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

लक्ष्मीकांत हंडे यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या लेकींचा शेकडो किलोमीटरचा त्रासदायक प्रवास वाचला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) पदासाठी पात्र ठरलेल्या शेकडो उमेदवार मुलींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या...