विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा : डॉ. आर. के. शर्मा

डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

कोल्हापूर : विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले.

कदमवाडी येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, भारतीय युवा विज्ञान अकादमी (INYAS) आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते नववीच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.


शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगांकडे केवळ प्रात्यक्षिक म्हणून न पाहता त्यामागील कारणांचा विचार करावा, असे आवाहन केले. प्रयोगातून जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्या जिज्ञासेतून नवे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न विचारण्याची व त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्तीच विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनाच्या क्षेत्राकडे घेऊन जाईल, असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके, विज्ञान प्रश्नमंजुषा, सूक्ष्मदर्शकाचे प्रात्यक्षिक, संशोधन प्रयोगशाळा व सिम्युलेशन लॅबला भेट तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अश्विनी काळे, सहसंयोजक डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. अर्पिता पांडे तिवारी, आयुकाचे रुपेश लबडे, जाहिदा शेख यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे...

‘आय ट्रिपल ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा

‘आय ट्रिपल ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा

-डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंगमध्ये विद्यार्थी शाखेचा शुभारंभ कोल्हापूर :  तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर...

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

कसबा बावडा : येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा,...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  कोल्हापूर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “तणाव...

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

-'स्कूल ऑफ लॉ' ला मंजुरी -कायदा क्षेत्रातील विविध संधींची द्वारे विद्यार्थ्यांसाठी खुली -अनुभवी विधीज्ञांचे मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन कोल्हापूर : कायदा क्षेत्रातील बदलत्या गरजा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि जागतिक स्तरावरील संधी लक्षात घेऊन तळसंदे येथील डी. वाय....

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

लक्ष्मीकांत हंडे यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या लेकींचा शेकडो किलोमीटरचा त्रासदायक प्रवास वाचला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) पदासाठी पात्र ठरलेल्या शेकडो उमेदवार मुलींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या...