‘आय ट्रिपल ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा

-डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन
-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंगमध्ये विद्यार्थी शाखेचा शुभारंभ

कोल्हापूर :  तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर भर द्यावा. इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन तांत्रिक व व्यावसायिक क्षमता विकसित कराव्यात, असे आवाहन आय-ट्रिपल-ईच्या महाराष्ट्र विभागाचे सचिव डॉ. चाणक्य कुमार झा यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोल्हापूर येथील संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागातर्फे आय-ट्रिपल-ई विद्यार्थी शाखा शुभारंभ समारंभात ते बोलत होते.

डॉ. झा यांनी तंत्रज्ञानातील बदलते प्रवाह, संशोधन, नवकल्पना आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांनी सतत अद्ययावत राहण्याचे आवाहन केले. आय-ट्रिपल-ईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद, तांत्रिक उपक्रम, संशोधनाच्या संधी, प्रकल्प तसेच व्यावसायिक नेटवर्किंगचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा होते. विद्यार्थ्यांनी आय-ट्रिपल-ईच्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची दृष्टी विकसित करून तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ पदवी मिळविण्यापेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा… 

सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना; थकीत एफआरपी, गाळप हंगाम पूर्वतयारीसाठी मिळणार निधी

महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक उपक्रम, प्रकल्प आणि संशोधनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कॅपजेमिनीचे सिनिअर अँड्रॉइड डेव्हलपर किशोर गुरव यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या अपेक्षा, करिअरच्या संधी आणि आवश्यक तांत्रिक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून श्रेयश माने तर प्रा. एस. एम. रणभिसे हे विद्यार्थी शाखा समन्वयक म्हणून हे काम पाहणार आहेत. संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. तानाजी पाटील यांच्या सहकार्याने विविध तांत्रिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे...

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा : डॉ. आर. के. शर्मा

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा : डॉ. आर. के. शर्मा

डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न कोल्हापूर : विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती...

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

कसबा बावडा : येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा,...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय पॉलिटेक्निक येथे तणाव व्यवस्थापन सेमिनार

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  कोल्हापूर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी  आणि  शासकीय पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “तणाव...

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ता

-'स्कूल ऑफ लॉ' ला मंजुरी -कायदा क्षेत्रातील विविध संधींची द्वारे विद्यार्थ्यांसाठी खुली -अनुभवी विधीज्ञांचे मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन कोल्हापूर : कायदा क्षेत्रातील बदलत्या गरजा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि जागतिक स्तरावरील संधी लक्षात घेऊन तळसंदे येथील डी. वाय....

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

चंद्रपूरऐवजी आता कोल्हापुरातच होणार ‘महिला मिलिटरी पोलीस’ मैदानी चाचणी

लक्ष्मीकांत हंडे यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या लेकींचा शेकडो किलोमीटरचा त्रासदायक प्रवास वाचला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) पदासाठी पात्र ठरलेल्या शेकडो उमेदवार मुलींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या...