हमीभाव योजनेसाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

कोल्हापूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात धान (भात) विक्रीसाठी १० ठिकाणी, तर नाचणी विक्रीसाठी ५ ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२६-२७ साठी शासनाने धानाचा (भात) प्रतिक्विंटल २ हजार ४४१ रुपये, तर नाचणीचा प्रतिक्विंटल ५ हजार २०५ रुपये किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.

Amaron

Amaron

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. यासाठी आधार कार्डची प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची स्वयंस्वाक्षांकित प्रत, पिकपेरा नोंद असलेला अद्ययावत ७/१२ व ८-अ उतारा तसेच ॲग्रीस्टॅक आयडी सादर करणे आवश्यक आहे.

धान (भात) व रागी (नाचणी) उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ असा आहे. कृषी विभागाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक संकेतस्थळावर शेतकऱ्यांचा Farmer ID देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादित, मुंबईचे कोल्हापूर विभागाचे संचालक संदिप नरके व संचालक धनश्रीदेवी घाटगे यांनी केले आहे.

PM-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा : जिल्हाधिकारी

PM-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा : जिल्हाधिकारी

२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याशी आधार संलग्न करणे (Aadhaar Seeding), भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) आणि AgriStack नोंदणी...

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुराडे, देसाई यांचे अर्ज दाखल

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुराडे, देसाई यांचे अर्ज दाखल

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण गटातून आठ, तर महिला गटातून तीन असे एकूण ११ अर्ज दाखल झाले. यामध्ये संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शेतकरी संघाचे माजी संचालक सुरेशराव देसाई, हंबीरराव वळके,...

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'सह्याद्री' अतिथीगृहात ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित...

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात अचानक झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारतातील सरकारी तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार पोहोचले आहे. याचा थेट परिणाम भारतीय तेल...

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

कोल्हापूर : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम...

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांसोबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता, त्याचे संभाव्य फायदे तसेच प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याची भूमिका आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केली....