डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात; हिरकणी मंचतर्फे आयोजन

कोल्हापूर :  कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि सौ. मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरी गीते सादर करून गौराईचे पारंपरिक खेळ उत्साहात सादर केले.

झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने, गायत्री आयरे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

म्हैसूर : एकेकाळी महिलांसाठी अनपेक्षित आणि आव्हानात्मक मानला जाणारा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आता म्हैसूरमधील अनेक महिलांसाठी स्वावलंबनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. कुटुंबातील पुरुषाचा, विशेषतः पतीचा आधार गमावल्यानंतर या महिलांनी रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाची...

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात मानव-वाघ संघर्षाचे व्यवस्थापन आणि मानव-वाघ सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी ३३ नव्याने नियुक्त प्राथमिक प्रतिसाद पथकाच्या (PRT) सदस्यांना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १० महिलांचा समावेश...

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

नवी दिल्ली : महिलांना पुरुषांच्या तुलनेत शरीराच्या विविध भागांमध्ये अधिक वेदना जाणवत असल्याचे एका मोठ्या जागतिक अभ्यासातून समोर आले आहे. ११८ देशांतील ६१ लाख २५ हजार ४५९ सहभागींच्या स्व-अहवालावर आधारित वेदनांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, महिलांनी...

पारंपरिक दौण्याचे आकर्षक पॅकेजिंग; मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

पारंपरिक दौण्याचे आकर्षक पॅकेजिंग; मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड; केकलेच्या महिलांचा अभिनव उपक्रम कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केकले गावातील महिला स्वयंसहायता समूहाने स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड देत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावात तयार होणाऱ्या आणि श्री क्षेत्र...

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

कोल्हापूर : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन,आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार ( दि.५)  रोजी आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका...

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि हेल्पलाईन सेवांची माहिती कोल्हापूर : ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेतून प्रेरित सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालक व महिलांच्या संरक्षणासह कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका...