जयशंकर-रुबिओ यांच्या मुंबईतील भेटीचे सरकारकडून समर्थन; ‘गेल्या दशकापासूनची परंपरा’

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे पुढील आठवड्यात मुंबईत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला केंद्र सरकारने शुक्रवारी उत्तर दिले. परदेशी नेत्यांचे आणि उच्चपदस्थ प्रतिनिधींचे नवी दिल्लीबाहेर स्वागत करण्याची परंपरा गेल्या दशकभरापासून सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात रुबिओ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान जयशंकर मुंबईत उपस्थित राहतील, असे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. रुबिओ हे मुंबई आणि जामनगरला भेट देणार असून, त्यांच्या दौऱ्यात नवी दिल्लीचा समावेश नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी अमेरिकेच्या राजदूतांनीच परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीची घोषणा का केली, असा प्रश्न उपस्थित केला होता. राहुल गांधी यांनी टीका करताना, ‘रुबिओ यांनी आपल्या कर्मचाऱ्याला मुंबईत बोलावून घेतले आहे,’ असे म्हटले होते.

परदेशी पाहुण्यांचे दिल्लीबाहेर स्वागत करण्याची परंपरा

परराष्ट्रमंत्र्यांना अमेरिकेने मुंबईत बोलावून घेतल्याच्या विरोधकांच्या टीकेवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिले. जयशंकर हे १९ आणि २० ऑक्टोबरदरम्यान मुंबईत संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) उपपंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर ते अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा करतील. तसेच, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाला जयशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयस्वाल म्हणाले, “गेल्या दशकभरापासून परदेशी पाहुण्यांचे दिल्लीबाहेर स्वागत करण्याची परंपरा सुरू आहे.”

यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेनच्या पंतप्रधानांचे वडोदरा येथे, जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांचे अहमदाबाद येथे, तर मॉरिशसच्या पंतप्रधानांचे वाराणसी येथे स्वागत केले होते. त्याचप्रमाणे, परराष्ट्रमंत्र्यांनी गोवा येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. गुजरातमधील केवडिया येथे बोत्स्वानाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले होते, तर अमृतसर येथे ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद आयोजित करण्यात आली होती.

भारत-UAE सहकार्याचा आढावा घेणार

संयुक्त अरब अमिरातीच्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे भारत आणि UAE यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीअंतर्गत सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेण्याची संधी मिळणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. “दोन्ही देशांचे प्रतिनिधी ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक), संरक्षण आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रांतील उपक्रमांचा आढावा घेतील आणि त्यांना पुढे नेण्यासाठी चर्चा करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, पश्चिम आशियातील परिस्थिती तसेच जागतिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा होणार आहे.

Amaron

Amaron

भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यावर भर

मार्को रुबिओ यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्याची तसेच दोन्ही देशांमधील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. जयस्वाल यांच्या मते, या चर्चेत ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच परस्पर हिताच्या अन्य क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचा समावेश असेल.

याशिवाय, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही दोन्ही देश चर्चा करतील. या भेटीमुळे भारत-अमेरिका यांच्यातील उच्चस्तरीय संवाद कायम ठेवण्यास आणि समान प्राधान्यक्रमांवर पुढे जाण्यास मदत होईल, असे जयस्वाल यांनी नमूद केले. यापूर्वी मे महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या रुबिओ यांनी क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला होता. तसेच, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी नवी दिल्ली येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.

भारताशी व्यापार बंद केल्याचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका; ४० अब्ज डॉलरच्या नुकसानीचा दावा

भारताशी व्यापार बंद केल्याचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका; ४० अब्ज डॉलरच्या नुकसानीचा दावा

इस्लामाबाद : भारतासोबत व्यापार बंद झाल्यामुळे पाकिस्तानला आतापर्यंत सुमारे ४० अब्ज डॉलरचे (४,००० कोटी डॉलर) आर्थिक नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तान-भारत व्यापार परिषदेचे (PIBC) अध्यक्ष नूर मोहम्मद कसूरी यांनी केला आहे. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबतचा...

जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्समधून ६.३६ अब्ज डॉलरची चोरी; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय

जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्समधून ६.३६ अब्ज डॉलरची चोरी; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या बायनान्स (Binance) च्या वॉलेटमधून सुमारे ६.३६ अब्ज डॉलर (क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. तपासकर्त्यांच्या मते, क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी ठरू शकते....

पंतप्रधान मोदींच्या ब्रुसेल्स दौऱ्यापूर्वी भारत-EU मुक्त व्यापार करारासाठी वेगवान हालचाली

पंतप्रधान मोदींच्या ब्रुसेल्स दौऱ्यापूर्वी भारत-EU मुक्त व्यापार करारासाठी वेगवान हालचाली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य ब्रुसेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युरोपीय महासंघ (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) डिसेंबरमध्ये अंतिम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या कराराला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी युरोपीय आयोगाने...

इराणवर युद्धाचे सावट! मध्यावधी निवडणुकांनंतर अमेरिका-इस्रायल मोठ्या हल्ल्याच्या तयारीत?

इराणवर युद्धाचे सावट! मध्यावधी निवडणुकांनंतर अमेरिका-इस्रायल मोठ्या हल्ल्याच्या तयारीत?

तेहरानच्या अणुकेंद्रांसह क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि ऊर्जा सुविधांना लक्ष्य करण्याची शक्यता; इराणचा कठोर प्रत्युत्तराचा इशारा मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर अमेरिका आणि इस्रायल इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई...

‘मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात किंवा छळ करू शकतात’; धोका पत्करून बांगलादेशात परतण्यास शेख हसीना तयार

‘मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात किंवा छळ करू शकतात’; धोका पत्करून बांगलादेशात परतण्यास शेख हसीना तयार

भारताने आश्रय दिल्याबद्दल मानले आभार; डिसेंबरपर्यंत मायदेशी परतण्याचा यापूर्वी व्यक्त केला होता मनोदय नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी जीवाला धोका असतानाही मायदेशी परतण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेशात परतल्यास आपल्याला ठार मारले जाऊ शकते,...

रशियाकडून तेल खरेदीवरील निर्बंधांतून दिलासा; भारतावरील १०० टक्के अतिरिक्त शुल्काचा धोका टळला

रशियाकडून तेल खरेदीवरील निर्बंधांतून दिलासा; भारतावरील १०० टक्के अतिरिक्त शुल्काचा धोका टळला

वॉशिंग्टन : रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या तरतुदींमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय हिताचे कारण देत सूट दिली आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंवर अमेरिकेत १०० टक्के अतिरिक्त शुल्क लादले...