ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत ॲड. शेलार यांची निवड करण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप मिळावे, त्यातून आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकेल व आपल्या देशात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना व्यासपीठ देतानाच ई-स्पोर्ट्सला केवळ मनोरंजन किंवा गेमिंग न मानता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे आव्हान स्वीकारून तरुणांसाठी काम करू. मैदानी खेळाप्रमाणे ई-स्पोर्ट्समध्येही प्रावीण्य असलेले खेळाडू तयार करू. त्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधून केंद्र सरकारशी आवश्यक तो संवाद साधू, असेही नवनियुक्त अध्यक्ष शेलार यांनी सांगितले.

ESGF ही आपल्या देशातील ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी कार्यरत महत्त्वाची संस्था असून या क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ पाहता यातील नव्या संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आपल्या देशात ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. भारतात सुमारे ५२ कोटी गेमर्स असून दिवसाला ११ कोटी खेळाडू खेळतात. आपल्या देशात २८ या खेळांच्या टूर्नामेंट होतात. हे गेम पाहणाऱ्यांची संख्या सुमारे ८ ते ९ कोटी एवढी आहे.

पारंपरिक क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीमध्ये जसे राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची व्यवस्था असते, त्याच धर्तीवर ई-स्पोर्ट्समध्येही एक संरचित व्यवस्था उभारण्याचे काम हे फेडरेशन करते. क्रिकेट, फुटबॉल, दोरीउड्या, दहिहंडी, साहसी खेळ अशा विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन व संघटनांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ॲड. आशिष शेलार यांच्या नियुक्तीमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा आशावाद फेडरेशनने व्यक्त केला आहे.

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...