अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. त्याआधी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील या बैठकांमधून काय निर्णय समोर येतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुनेत्रा पवारांना डावलून अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा

दरम्यान, अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना वगळून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयावरूनही प्रश्न उपस्थित केले जात होते. या वृत्तावर पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. काही अदृश्य शक्तींकडून दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवारांनीच दिली होती भेटीची माहिती

उमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांवर या भेटीत सविस्तर चर्चा झाली होती. याच भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांना दिली होती. तसेच या भेटीसाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली होती, असे उमेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्ली भेटीवरून सुरू झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काही महत्त्वाचे संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...

सत्तेचा अहंकार वाढला की मग त्याचा  ‘गोकुळ’ होतो : उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला

सत्तेचा अहंकार वाढला की मग त्याचा  ‘गोकुळ’ होतो : उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला

‘ही भारत-पाकिस्तानची लढाई नाही’; मित्रपक्षातील नेत्यांना सत्तेचा माज न बाळगण्याचा सल्ला, महायुतीला दिला घरचा आहेर सोलापूर : “जेव्हा सत्तेचा अहंकार वाढतो आणि ‘मी बोलेन तेच योग्य’ अशी भावना निर्माण होते, तेव्हा गोकुळ दूध संघासारखा निकाल लागतो,” अशा शब्दांत उद्योगमंत्री...