पारंपरिक दौण्याचे आकर्षक पॅकेजिंग; मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड; केकलेच्या महिलांचा अभिनव उपक्रम

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केकले गावातील महिला स्वयंसहायता समूहाने स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड देत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावात तयार होणाऱ्या आणि श्री क्षेत्र जोतिबाला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक दौण्याला आकर्षक पॅकेजिंगद्वारे व्यावसायिक स्वरूप देऊन त्याची श्री क्षेत्र जोतिबा येथे विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दौण्यापासून सुगंधी अत्तर, अगरबत्ती, साबण आदी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा समूहाचा मानस आहे. उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासोबतच आवश्यकतेनुसार पेटंट व इतर बौद्धिक संपदा हक्कांची नोंदणी करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत उत्पादक गटाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

यापूर्वी याच महिला समूहाने देशी अंडी संकलन केंद्राचा उपक्रम यशस्वीपणे राबवून महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या उपक्रमाला गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तालुका अभियान व्यवस्थापक तौमर अल्ताफ मुजावर, प्रभाग समन्वयक माधुरी मोरे, सीआरपी तनिष्का पाटील तसेच ग्रामस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. स्थानिक परंपरा, महिलांची कल्पकता आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून केकले गावातील हा ग्रामीण महिला सक्षमीकरणासह स्थानिक उत्पादनांना व्यावसायिक ओळख मिळवून देणारा ठरत आहे.

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

म्हैसूर : एकेकाळी महिलांसाठी अनपेक्षित आणि आव्हानात्मक मानला जाणारा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आता म्हैसूरमधील अनेक महिलांसाठी स्वावलंबनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. कुटुंबातील पुरुषाचा, विशेषतः पतीचा आधार गमावल्यानंतर या महिलांनी रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाची...

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात मानव-वाघ संघर्षाचे व्यवस्थापन आणि मानव-वाघ सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी ३३ नव्याने नियुक्त प्राथमिक प्रतिसाद पथकाच्या (PRT) सदस्यांना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १० महिलांचा समावेश...

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

नवी दिल्ली : महिलांना पुरुषांच्या तुलनेत शरीराच्या विविध भागांमध्ये अधिक वेदना जाणवत असल्याचे एका मोठ्या जागतिक अभ्यासातून समोर आले आहे. ११८ देशांतील ६१ लाख २५ हजार ४५९ सहभागींच्या स्व-अहवालावर आधारित वेदनांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, महिलांनी...

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

कोल्हापूर : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन,आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार ( दि.५)  रोजी आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका...

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि हेल्पलाईन सेवांची माहिती कोल्हापूर : ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेतून प्रेरित सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालक व महिलांच्या संरक्षणासह कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका...

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

कोल्हापूर : भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. दरवर्षी भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या गडहिंग्लज मधील स्पर्धेलाही महिलांनी मोठ्या...