महिला व बाल विकास विभागामार्फत २३ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात पॉश अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यानुसार १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था आणि आस्थापनांमध्ये महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती (ICC) गठीत करणे बंधनकारक आहे.


जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील कार्यालये व संस्थांची विशेष मोहिमेंतर्गत अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत न केलेल्या २३ कार्यालये व संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तत्काळ अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


पॉश अॅक्ट २०१३ नुसार सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या तसेच त्यांच्या शाखांनी केंद्र शासनाच्या SHE-BOX पोर्टलवर नोंदणी करणे, अंतर्गत तक्रार समितीची स्थापना व नोंदणी करणे, समितीचे तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे आणि वार्षिक अहवालासह आवश्यक माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे.


तपासणीदरम्यान या बाबींची पूर्तता झालेली नसल्याचे आढळल्यास ५० हजार रुपये दंडाची तरतूद असून, संबंधित संस्था अथवा कार्यालयाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कार्यालयांनी अथवा संस्थांनी अद्याप अंतर्गत तक्रार समिती गठीत केलेली नाही, त्यांनी तत्काळ समिती गठीत करून SHE-BOX पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले.

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

स्त्री रोग तज्ज्ञांची 'ग्लोरियस २०२६' वैद्यकीय परिषद संपन्न -डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा 'लिजंड अवॉर्ड' ने सन्मान कोल्हापूर : भारतात आज वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धती आल्या असल्या तरी अजूनही ५७ टक्के महिलांपर्यंत आरोग्य...

श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र देवून मातृशक्तीला वंदन करण्यात आल्या. मातृ ॠण हे कधीही न फिटणारं ॠण आहे. या ॠणातच कायम राहण्यात आपण धन्यता मानतो, अशा भावना...

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणून १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २ हजार ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT)...

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

कोल्हापूर : जाणते-अजाणतेपणी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्याची शिक्षा ते आज भोगत आहेत. कुटुंबांपासून ते दुरावले गेलेत. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांना बहिणीची माया मिळावी, या उद्देशाने नुकतंच कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने रक्षाबंधन...

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

कोल्हापूर : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणार्‍या पोलिसांना, नेहमीच सण समारंभाला मुकावे लागते. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. त्यातून जनसेवेत २४ तास कार्यरत...

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली १३...