मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

१७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

नागरिकांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन सुरू

मुंबई : राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील . मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो. मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...