श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र देवून मातृशक्तीला वंदन करण्यात आल्या. मातृ ॠण हे कधीही न फिटणारं ॠण आहे. या ॠणातच कायम राहण्यात आपण धन्यता मानतो, अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा… 

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मायेची ऊब, प्रेमाचा आधार आणि संस्कारांची शिदोरी देणारी व्यक्ती अशी आईची ओळख आहे. आईच्या निरपेक्ष, निर्व्याज प्रेमाची बरोबरी होवू शकत नाही. ज्या माऊलीने आपल्याला जग दाखवले, त्या आईच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी व्हावा, यासाठी आपणही प्रयत्न करत असतो. यातूनच आजचा दिवस खासदार धनंजय महाडिक परिवारासाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरला. मातोश्री श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा आज ७५ वा वाढदिवस. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महाडिक कुटुंबीयांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, मातोश्रींना पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्यासाठी सर्वांनीच व्यक्त केलेल्या भावना आणि मातोश्रींकडून मिळणारे आशिर्वाद अशा वातावरणात हा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपन्न झाला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी श्रीमती शकुंतला आणि मंगलताई यांना मानपत्र देवून केलेले मातृवंदन लक्षवेधी ठरले.

याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुरेश हाळवणकर, सौ. अंजली चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या अमृत महोत्सवी वाढदिवसाला हजेरी लावली.

कार्यक्रमस्थळी महाडिक कुटुंबियांच्या वाटचालीची आणि मातोश्रींबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांची चित्रफितही दाखवण्यात आली. आईने आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवत प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली. मुलांच्या जडणघडणीत तिचे योगदान मोलाचे असून, प्रेम, त्याग, संयम आणि संस्कारांच्या बळावर तिने कुटुंबाला संस्कार दिले. त्यांच्या मायेच्या सावलीत आमच्या जीवनाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुढील जन्मसुध्दा याच मातेच्या पोटी मिळावा, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.

यावेळी महाडिक कुटुंबीयांनी आईच्या आठवणींना उजाळा देत तिच्या जीवनप्रवासातील विविध प्रसंग सांगितले. यावेळी सौ. अरूंधती महाडिक, सौ वैष्णवी महाडिक, सौ मंजिरी महाडिक, संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह परिवारातील सर्वांनीच आजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आईच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाडिक कुटुंबीय आनंदात न्हाऊन निघाले होते. प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादांनी भरलेला हा अमृतमहोत्सवी वाढदिवस महाडिक कुटुंबासह सर्वांसाठी अविस्मरणीय प्रसंग ठरला.

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

स्त्री रोग तज्ज्ञांची 'ग्लोरियस २०२६' वैद्यकीय परिषद संपन्न -डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा 'लिजंड अवॉर्ड' ने सन्मान कोल्हापूर : भारतात आज वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धती आल्या असल्या तरी अजूनही ५७ टक्के महिलांपर्यंत आरोग्य...

महिला व बाल विकास विभागामार्फत २३ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

महिला व बाल विकास विभागामार्फत २३ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात पॉश अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यानुसार १० किंवा त्याहून अधिक...

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणून १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २ हजार ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT)...

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

कोल्हापूर : जाणते-अजाणतेपणी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्याची शिक्षा ते आज भोगत आहेत. कुटुंबांपासून ते दुरावले गेलेत. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांना बहिणीची माया मिळावी, या उद्देशाने नुकतंच कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने रक्षाबंधन...

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

कोल्हापूर : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणार्‍या पोलिसांना, नेहमीच सण समारंभाला मुकावे लागते. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. त्यातून जनसेवेत २४ तास कार्यरत...

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली १३...