महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

स्त्री रोग तज्ज्ञांची ‘ग्लोरियस २०२६’ वैद्यकीय परिषद संपन्न

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा ‘लिजंड अवॉर्ड’ ने सन्मान

कोल्हापूर : भारतात आज वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धती आल्या असल्या तरी अजूनही ५७ टक्के महिलांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरचे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्त्री रोग व प्रसुती तज्ञ संघटना (AMOGS) आणि स्त्री रोग प्रसुती विभाग, डी वाय पाटील मेडिकल कॉलेज,
डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठ व कोल्हापूर स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ संघटना (KOGS) यांच्यावतीने आयोजित ‘ग्लोरियस २०२६’ या विभागीय वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती संजय डी. पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांना ‘AMOGS Legend Award’ ने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा… 

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

 

हॉटेल सयाजी येथे ही दोन दिवसीय परिषद संपन्न झाली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, स्त्री रोग संघटनेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमेय पुरंदरे, सचिव डॉ. रोहन पालशेतकर, कोल्हापूर स्त्री रोग आणि प्रसुतीतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.एम.जे.नागावकर, डॉ. रणजीत किल्लेदार, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. प्रशांत शहा, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या स्त्री व प्रसूतीरोग विभागप्रमुख डॉ. नीलिमा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले.

यावेळी डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, स्त्रीने स्वतःला कमी समजू नये. स्त्रीमध्ये लढण्याची ताकद, समजून घेण्याची क्षमता, कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, मोठी स्वप्ने, नेतृत्व गुण, आव्हान स्वीकारण्याची क्षमता असते. यामध्ये तिचे आरोग्य चांगले असणे खूप महत्वाचे आहे. मात्र, भारतीय स्त्रिया योगा, निरोगी दिनचर्या, आहार याकडे दुर्लक्ष करतात. गर्भधारणा, गर्भावस्था व प्रसूती या सर्व प्रक्रियेमध्ये याबाबत जास्त सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे डॉ. कानिटकर यांनी सांगितले.

कोल्हापूर स्त्री रोग आणि प्रसुतीतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ एम.जे. नागावकर यांनी परिषदेचा उद्देश विषद केला. वैद्यकीय क्षेत्र आणि समाज यांच्यातील दुवा अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल असा विश्वास डॉ. नागावकर यांनी व्यक्त केला. राज्य संघटनेचे सचिव डॉ. रोहन पालशेतकर यांनी कोल्हापूर संघटनेचे कौतुक केले. स्त्री रोग राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमेय पुरंदरे म्हणाले, महिलांच्या शिक्षणाप्रमाणे चांगले स्वास्थ्य त्यांना मिळण आवश्यक आहे. ‘आरोग्य स्त्रीचे, सामर्थ्य राष्ट्राचे’ याविषयावर लक्ष केंद्रित करण गरजेचे आहे. माजी राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर यांनी राज्य आणि कोल्हापूर संघटनेच्या सदस्यांनी लोकहितासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.

या प्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती संजय डी. पाटील यांना संघटनेतर्फे सन्मानित करण्यात आले. डॉ.संजय डी. पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते डॉ. आशा दलाल, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. किरण कुर्तकोट्टी आणि डॉ. शिरीष पटवर्धन यांना ‘AMOGS Legend Award’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचा यावेळी संघटनेतर्फे हस्ते ‘गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  “ग्लोरियस २०२६” परिषदेमध्ये प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोगशास्त्र, वंध्यत्व, फिटल मेडिसिन, रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, लॅप्रोस्कोपी, मेनोपॉज, किशोरवयीन आरोग्य, लैंगिक आरोग्य, कोल्पोस्कोपी, अल्ट्रासाऊंड आणि क्रिटिकल केअर या विषयांवर तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

‘पब्लिक फोरम’ मध्ये गरोदर महिलांना मार्गदर्शन
दरम्यान शुक्रवार दि. ११ रोजी डॉ.डी.वाय पाटील हॉस्पिटल येथे आयोजित पब्लिक फोरममध्ये गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात यावेळी उपस्थित महिलांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी व तपासणी तसेच आहार व व्यायाम या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उप अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. नीलिमा शहा आदी उपस्थित होते. या परिषदेस डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. भारती अभ्यंकर, डॉ. शिंपा शर्मा यांच्यासह स्त्री व प्रसूतीरोग तज्ञ उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभागामार्फत २३ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

महिला व बाल विकास विभागामार्फत २३ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात पॉश अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यानुसार १० किंवा त्याहून अधिक...

श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र देवून मातृशक्तीला वंदन करण्यात आल्या. मातृ ॠण हे कधीही न फिटणारं ॠण आहे. या ॠणातच कायम राहण्यात आपण धन्यता मानतो, अशा भावना...

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

१ कोटी ६४ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना २,४३७ कोटींची ओवाळणी; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता जमा

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणून १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २ हजार ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT)...

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

भागीरथी महिला संस्थेतर्फे बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम

कोल्हापूर : जाणते-अजाणतेपणी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्याची शिक्षा ते आज भोगत आहेत. कुटुंबांपासून ते दुरावले गेलेत. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांना बहिणीची माया मिळावी, या उद्देशाने नुकतंच कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने रक्षाबंधन...

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

कोल्हापूर : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणार्‍या पोलिसांना, नेहमीच सण समारंभाला मुकावे लागते. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. त्यातून जनसेवेत २४ तास कार्यरत...

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली १३...