अध्यक्ष आमचाच, निवडीच्या सभेत महायुती तांत्रिक मुद्दा आणणार नाही : आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरमचा तांत्रिक मुद्दा पुढे आला आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक यांनी सहकारात काम केले आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावर ते अशी कोणतीही परिस्थिती तयार करणार नाहीत. त्यांचे सगळे १२ संचालक निश्चिपणे त्या सभेला येतील, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

लढलो की जिंकू शकतो हा संदेश गोकुळच्या माध्यमातून राज्यभर गेला आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळ निवडणुकीत कोरमचा विषय आहे. पण बहुमताचा निकाल आमच्या बाजूने आहे. विरोधकांनी आम्हाला मिळालेल्या बहुमताचे स्वागत केले आहे. चुकीचा पायंडा राज्याच्या सहकारात पडणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ, पालक्षमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक चुयेकरांच्या मुलाला चेअरमन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील अशी खात्री आहे असे सांगत आमदार पाटील यांनी गोकुळचा चेअरमन आमचाच होणार यात दुमत नाही असा दावाही केला.

 

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...