उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. साखरेचे दर आगामी काळात प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांवर स्थिर राहिल्यास अतिरिक्त हप्ता देण्याची तयारीही कारखानदारांनी दर्शवली आहे. उसाच्या पहिल्या उचलीवरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ऊस गळीत हंगाम ठप्प झाला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी आणखी ५०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम आहे.

बॉन्डवर हमी देण्याची कारखानदारांची तयारी

गेल्या तीन महिन्यांत साखरेला प्रतिक्विंटल ४,१०० रुपये दर मिळाला आहे. या दरानुसार बँकांकडून साखरेच्या मूल्याच्या ८५ टक्के रक्कम उचल म्हणून मिळणार आहे. त्यातून कर्जाचे हप्ते, ऊसतोडणी, वाहतूक आणि इतर खर्च वजा केल्यानंतर किती रक्कम शिल्लक राहते, असा प्रश्न कारखानदारांनी उपस्थित केला आहे. साखरेचे दर यापुढेही स्थिर राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याची हमी बॉन्डवर लिहून देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शवल्याचे समजते.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल देण्यावर एकमत झाल्याचे समजते. भविष्यात साखरेचे दर स्थिर राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.शेतकरी संघटनांनी प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मागितली असली, तरी ४,००० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी अतिरिक्त २०० रुपये स्वीकारण्याबाबत तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसांत दोन्ही बाजूंमध्ये सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

राज्यातील अन्य भागांतील साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करून कार्यरत झाले आहेत. मग केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनाच लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल कारखानदारांनी उपस्थित केल्याचे समजते. राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना अडचणीत का आणले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सांगितले जाते.पहिल्या उचलीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष कायम असल्याने गळीत हंगाम कधी सुरू होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Amaron

Amaron

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ऊस पिकातील प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांसाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात...