अजित पवार हयात असते तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले असते; १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची तारीख ठरली होती : सुनील तटकरे यांचा मोठा दावा

मुंबई : अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाले नसते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले असते. एवढेच नव्हे, तर दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणासाठी १२ फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली होती, असा महत्त्वपूर्ण दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे विलीनीकरणाची प्रक्रिया थांबली, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही तटकरे यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. मात्र, सध्या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा… 

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग,सोमवारी संघर्ष मोर्चा

१२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची तारीख निश्चित झाली होती?

माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांच्याशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याची प्रबळ इच्छा होती. त्यादृष्टीने झालेल्या चर्चांनुसार १२ फेब्रुवारी ही तारीखही निश्चित होणार होती. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे या प्रक्रियेला खीळ बसली.

तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, तटकरे यांनी त्यावेळची वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांच्या विधानामुळे विलीनीकरणाबाबत आम्ही यापूर्वी घेतलेल्या भूमिकेला दुजोरा मिळाला आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, तर जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. महाराष्ट्रात एक मजबूत राजकीय ताकद उभी राहावी, अशी अजित पवार यांच्यासह दोन्ही बाजूंच्या नेत्यांची इच्छा होती, असेही शिंदे यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल-शरद पवार भेटीनंतर चर्चेला वेग

गुरुवारी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बोलताना, ‘आम्ही मनाने कधीच दूर गेलो नव्हतो,’ असे विधान पटेल यांनी केले. तसेच १० नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटण्याचे संकेतही त्यांनी दिले. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाली. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून, १० नोव्हेंबरनंतर ते अलिबाग येथे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जाणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली. प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या विधानात १० नोव्हेंबरचा उल्लेख केल्याने या तारखेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचीही चर्चा

पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी मोदी यांनी पवार यांना विश्रांती घेण्याचा आणि कोणतीही काळजी न करण्याचा सल्ला दिला होता. ‘तुम्ही विश्रांती घ्या, काळजी करू नका. सुप्रिया सक्षम आहेत,’ असे मोदी यांनी शरद पवार यांना सांगितल्याची माहिती समोर आली होती. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत मोदी यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली.

Amaron

Amaron

एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि गौतम अदानी यांची भेट

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दूरध्वनी केला. शुक्रवारी सुप्रिया सुळे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, शनिवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तूर्तास विलीनीकरणाची शक्यता नाही; शरद पवार गटाची भूमिका

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी यापूर्वीही आम्ही पुढाकार घेतला होता. मात्र, दुसऱ्या बाजूने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ चर्चा करून काही साध्य होणार नाही. पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित नेतृत्वावर आहे. विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा असल्यास संबंधितांनी पक्षात येऊन तो घ्यावा, अशी भूमिका शरद पवार यांनी यापूर्वीच मांडली आहे, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार किंवा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशा स्वरूपाच्या बातम्या निराधार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सुनील तटकरे यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या संदर्भात दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सण अग्रिमाची मर्यादा २० हजारांवर

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सण अग्रिमाची मर्यादा २० हजारांवर

वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना २० हजारांचे सानुग्रह अनुदान; एसटी कर्मचाऱ्यांना १० हजारांचा बोनस आणि महागाई भत्त्यात वाढ मुंबई : राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसह वीज कंपन्या आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले...

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे : पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील...

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...