ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे

कोल्हापूर : बाळूमामा आणि हालसिद्धनाथ हे लाखो कष्टकरी शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या पवित्र भंडाऱ्याचा वापर गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत मत सुरक्षित ठेवण्यासाठी ‘बॉण्ड पेपर’सारखा करणे ही देवांची विटंबना नाही का? असा सवाल करत गोकुळच्या ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची नामुष्की महायुतीच्या नेत्यांवर आल्याची टीका भाकपाचे सरचिटणीस सतिशचंद्र कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

हे ही वाचा… 

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

 

पत्रकात पुढे म्हणले आहे की, राज्याच्या सहकार आणि दूध क्षेत्रातील सर्वात मोठा रणसंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीने अत्यंत खालच्या आणि संतापजनक पातळीवर ही निवडणूक नेऊन पोहचवली आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कर्मकांड, अनिष्ठ रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला त्याच करवीरनगरीत सत्तेसाठी अंधश्रद्धेला उघडपणे खतपाणी घातले जात आहे.

गोकुळच्या मतदानावर पकड ठेवण्यासाठी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून ठरावधारकांना थेट देवाच्या शपथा घ्यायला लावल्या जात आहेत. यामुळे कोल्हापुरच्या पुरोगामी आणि वैचारिक ओळखीलाच काळिमा फासण्याचे काम महायुतीकडून सुरु आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामाचा भंडारा आणि अप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथाचा पवित्र भंडारा तसेच राधानगरीतील जागृत देवस्थान विठलाई देवीचा अंगारा हातामध्ये देऊन आम्ही महायुतीच्याच पॅनेलला मतदान करणार अशी शपथ घेण्यास ठरावधारकांना बळजबरीने भाग पाडले जात आहे.

ग्रामीण भागातील ठरावधारक देवाच्या कोपाच्या भीतीने या दबावाखाली येत असून त्यांच्या कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याशी महायुतीचे नेते एक प्रकारे खेळ करत असल्याचे चित्र आहे. जर तुमच्याकडे ४४०० ठराव असतील तर मग मतदारांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारे शपथा घ्यायला लावण्याची नामुष्की का आली? कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचे नेतृत्व करणारा जिल्हा राहिला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी संघर्ष केला, तो कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात असतानाही गोकुळच्या निवडणुकीत राजरोसपणे त्याचा भंग होताना दिसत आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी थेट मतदारांच्या धार्मिक भावनांचा आणि विश्वासाचा बाजार मांडला असल्याचा आरोप सतिशचंद्र कांबळे यांनी या पत्रकात केला आहे.

Amaron

Amaron

महायुतीच्या नेत्यांना आमचे काही सवाल… 
-शाहूंच्या नगरीत कर्मकांडाचे उदात्तीकरण का? पुरोगामी कोल्हापूरची मान संपूर्ण जगात शैक्षणिक व सामाजिक क्रांतीसाठी उंचावली आहे, तिथे सत्तेसाठी मतदारांना अंधश्रद्धेच्या विळख्यात ढकलणे नेत्यांना शोभते का?
-एखाद्याला बळजबरीने देवाचा भंडारा शिवायला लावून शपथ घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असताना, पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी यावर स्वतःहून गुन्हे दाखल का करत नाहीत?
-मतदारांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा अधिकार महायुतीच्या नेत्यांना कोणी दिला? लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्याचे हनन करून मतदारांना मानसिक दबावाखाली ठेवणे हा लोकशाहीचा खून नाही का?

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...