राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल (१४ वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे व्हा. चेअरमन डी.जी. किल्लेदार, महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिऐशन सचिव राजाराम राऊत, एस.व्ही. सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सन २०२६-२७ मधील राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. १४ वर्षांखालील मुले व मुलींसाठी ही स्पर्धा दि. १० ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये मुलांचे ९ संघ आणि मुलींचे ८ संघ, असे एकूण १७ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघासोबत १६ खेळाडू तसेच १ प्रशिक्षक व १ व्यवस्थापक यांचा समावेश नियोजित आहे. या स्पर्धेत मुलांचे संघ ९, मुलींचे संघ-८, एकूण सहभागी संघ-१७, निवड चाचणी खेळाडू व एकूण खेळाडू-२७२, पंच व तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक, निवड समिती सदस्य-५०, खेळाडू निवड चाचणीसाठी नियोजित संख्या-८० एकूण सहभाग संख्या ४०२ अशी असणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्याच्या विविध भागांतून सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे आरोग्य, सुरक्षितता आणि सोयी-सुविधांचा विचार करून महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे निवासाचे नियोजन करण्यात आले आहे.

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...

भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दहीहंडीच्या तयारीची झाली पाहणी, सुरक्षेचे सर्व नियम पाळत साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीनं दहीहंडी सोहळा...