जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “जाधववाडी, कदमवाडी परिसरातील जनता नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. या भागाच्या विकासासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील. परिसरातील उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील. नागरिकांना आवश्यक असलेल्या कोणत्याही नागरी सुविधांची वानवा या भागात राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री दत्त मंदिर हे परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, मंदिर इमारतीच्या नूतनीकरणामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिसरातील धार्मिक स्थळांसोबतच मूलभूत नागरी सुविधांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.जाधववाडी-कदमवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक कामासाठी पाठपुरावा केला जाईल. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्यात येईल, असेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.

पूरनियंत्रण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

जाधववाडी आणि कदमवाडी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात तसेच पूरस्थितीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पूरपरिस्थितीत या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मित्र संस्थेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पूरनियंत्रण प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी वितरित करण्यात आला असून, प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. पूरनियंत्रण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जाधववाडी, कदमवाडी परिसरासह शहरातील पूरप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Amaron

Amaron

यावेळी नगरसेविका सौ.प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र कसबेकर, माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, श्रीमती प्रमिला डकरे, नंदकिशोर डकरे, संजय कसबेकर, श्री शाहू विकास सेवा संस्थेचे चेअरमन विजय मोहिते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनय वाणी, विभागप्रमुख यशवंत उर्फ बंडा माने, विभागप्रमुख मुन्ना तोरस्कर, शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, श्री.शाहू विकास सेवा व श्री दत्त भक्त मंडळ, जाधववाडी परिसरातील नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, भाविक तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नळ पाणीपुरवठा...