जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाहन हस्तांतरण व बास्केटबॉल मैदान अनावरण सोहळा संपन्न

कोल्हापूर : पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या ४५ वाहनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनांचा हस्तांतरण सोहळा आणि शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचा अनावरण सोहळा जिल्हा पोलीस मैदान येथे संपन्न झाला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्ह्याच्या विकासाला योग्य पध्दतीने खर्च व्हावा, हा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा उद्देश आहे. पोलीस दल अधिक गतिमान करण्यासाठी सक्षम वाहनव्यवस्था आवश्यक असून, नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी निश्चितच होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे काम केल्यास विकासाची अधिक चांगली कामे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांना घरांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर मार्ग निघणार आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि भूमी अभिलेख विभागासाठी मोजणीकरिता आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीही या निधीचा उपयोग होत आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रभावीपणे खर्च होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले की, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व सक्षम करण्याासाठी तसेच नागरिकांच्या सेवेत अधिक तत्परतेने जाण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ इनोव्हा हायक्रॉस, १ टाटा सफारी, २० महिंद्रा स्कॉर्पीओ (विविध प्रकारातील), २० महिंद्रा बोलेरो, १ टाटा वॉटर टॅंकर व १ वज्र वाहन अशी एकूण ४५ वाहने कोल्हापूर पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. कोल्हापूर जिल्हा हा धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात विविध उत्सव, व्हीआयपी दौरा, कायदा व सुव्यवस्थेचे प्रसंग, वाहतूक व्यवस्थापन, गुन्हेगारी नियंत्रण या सर्व बाबींवर पोलीस दलास २४ तास सतर्क रहावे लागतात. अशा वेळी पोलीस दलाची जबाबदारी अत्यंत महत्वाची असते. या करीता पोलीस दलास हे वाहन उपलब्ध करुन दिले आहे. यापूर्वीही पोलीस दलास २९ वाहने उपलब्ध करुन देण्यात आली होती. उपलब्ध करुन दिलेल्या वाहनाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Amaron

Amaron

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन वाहनांच्या चाव्या पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वाहनांच्या हस्तांतरणा सोबतच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी उभारण्यात आलेल्या शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे अनावरणही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

रायपूर : सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कथित महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ओमानमधून भारतात आणले आहे. चंद्राकर याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक ओमानला गेले होते. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या...

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून गावात...

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका १६ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका रोबोटला जप्त केले आहे. फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर या रोबोटने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन...

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

गारगोटीत खळबळ; संशयित प्रियकर स्वतःहून पोलिसांत हजर, चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती कोल्हापूर : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणीला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून दरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यात घडली....

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

कोल्हापूर : शहर आणि परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन सराईत संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जयंती नाला परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. सॅम्युअल दीपक पवार (वय २२, रा. ई. पी. स्कूल कंपाऊंडजवळ, कनाननगर) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय...

चैनीसाठी मुलानेच मारला घरातील १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; शिंगणापूरमध्ये चोरीचा बनाव उघड

कोल्हापूर : महागडा मोबाइल घेण्यासाठी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असल्याने मुलानेच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार शिंगणापूर येथे उघडकीस आला. चोरी झाल्याचा बनाव करून कुटुंबीयांना माहिती देणाऱ्या तरुणाला...