एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

कोल्हापूर : शहर आणि परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन सराईत संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जयंती नाला परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. सॅम्युअल दीपक पवार (वय २२, रा. ई. पी. स्कूल कंपाऊंडजवळ, कनाननगर) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय २४, रा. बेकर गल्ली, शाहूपुरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दुचाकी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात अमली पदार्थांचा साठा आणि विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, जयंती नाला परिसरात दोन तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी परिसरात सापळा रचला. संशयित दोघे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सीमा शेळके, पोलिस अंमलदार अशोक पोवार, सत्यजित तानुगडे, अरविंद पाटील आणि रत्नदीप जाधव यांच्या पथकाने केली.

सॅम्युअलविरोधात यापूर्वीही गुन्हे

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित सॅम्युअल पवार याच्याविरोधात यापूर्वी अमली पदार्थांची विक्री आणि हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुन्हा अमली पदार्थ तस्करीत त्याचा सहभाग आढळल्याने पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीदरम्यान त्याने हे अमली पदार्थ कोल्हापुरातील काही गुन्हेगारांकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सॅम्युअल पवार आणि आदित्य कस्तुरे हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच उच्चभ्रू कुटुंबातील तरुणांना अमली पदार्थ विक्री करीत असल्याचा पोलिसांचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

रायपूर : सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कथित महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ओमानमधून भारतात आणले आहे. चंद्राकर याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक ओमानला गेले होते. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या...

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाहन हस्तांतरण व बास्केटबॉल मैदान अनावरण सोहळा संपन्न कोल्हापूर : पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी जिल्हा वार्षिक...

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून गावात...

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका १६ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका रोबोटला जप्त केले आहे. फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर या रोबोटने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन...

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

गारगोटीत खळबळ; संशयित प्रियकर स्वतःहून पोलिसांत हजर, चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती कोल्हापूर : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणीला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून दरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यात घडली....

चैनीसाठी मुलानेच मारला घरातील १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; शिंगणापूरमध्ये चोरीचा बनाव उघड

कोल्हापूर : महागडा मोबाइल घेण्यासाठी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असल्याने मुलानेच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार शिंगणापूर येथे उघडकीस आला. चोरी झाल्याचा बनाव करून कुटुंबीयांना माहिती देणाऱ्या तरुणाला...