बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर अश्रू आणि श्रद्धेने नतमस्तक होत साकडे घातले. गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली, सत्तेची गणितं बदलली. आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शशिकांत पाटील-चुयेकर यांना चेअरमन करण्याचा शब्द दिला होता.

गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारली. त्यामुळे गोकुळला उजिर्तावस्था मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लया त्यांच्या रक्ताचा वारसदार शशिकांत पाटील-चुयेकर यांना न्याय मिळावा, अशी भावना चुये ग्रामस्थांनी व्यक्त केली. पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील सचिन सर्जेराव पाटील या कार्यकर्त्याने कुशिरे ते थेट श्री अंबाबाई मंदिरापर्यंत तब्बल २५ किलोमीटरचा दंडवत घातला. तर दुसरीकडे, गोकुळ शिरगाव येथील स्व. चुयेकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या दूध उत्पादकांनी पुष्पहार अर्पण करताना अभिवादन केले.

हे ही वाचा… 

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

“पक्षीय राजकारण आणि खुर्च्यांची ताटातूट शेतकऱ्यांनी खूप पाहिली. पण ज्या माणसाने गोकुळसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं, त्या आनंदराव चुयेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्या मुलाला संधी मिळायलाच हवी.” — विश्वास कोंडिबा शिंदे (कणेरी)

“स्व. आनंदराव पाटलांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर शशिकांत पाटलांना चेअरमन करा. सर्व २५ संचालकांनी पक्षभेद बाजूला ठेवून एका सच्चा कार्यकर्त्याच्या पुत्राच्या पाठीशी उभं राहावं.” — सर्जेराव आनंदराव पाटील (गडमुडशिंगी)

“तळागाळातील सामान्य दूध उत्पादकासाठी आनंदराव चुयेकरांनी घेतलेले कष्ट आम्ही डोळ्यांनी पाहिलेत. त्या कष्टाची पावती आज त्यांच्या मुलाला मिळायला हवी.” — वसंत ज्ञानू राऊत

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ऊस पिकातील प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांसाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात...