अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार

कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. केटीवेअर दुरुस्ती, देखभाल, बर्गे लावणे- काढणे, पाण्याचे नियोजन याबाबतचा निर्णय जलसंपदा विभाग आणि इरिगेशन फेडरेशन, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे घ्यावा. सध्याचे वर्ष हे पर्जन्यमानाच्या दृष्टिने असाधारण वर्ष आहे. त्यामुळे पालकमंत्री यांनी प्रत्येक महिन्याला पाण्याच्या नियोजनाचा आढावा घ्यावा, अशी विनंती करुन आपण स्वत: दर दोन महिन्यांनी या खात्याचा मंत्री म्हणून आढावा बैठक घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याबाबत माहिती मिळण्यासाठी तसेच त्यांच्या काही समस्या, तक्रारी असल्यास त्या विभागाला कळविण्यासाठी अधिक्षक अभियंता कार्यालयामध्ये आणि प्रत्येक कार्यकारी अभियंता कार्यालमयाध्ये हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, आमदार जयंत पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अरुण लाड, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांच्यासह कालवा समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, चालू वर्ष हे अल निनोच्या प्रभावामुळे अत्यंत कमी पर्जन्यमानाचे आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये कडक दुष्काळ आहे. अशा वेळी तुलनेने कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती बरी आहे. पण आपण सर्वांनी उपलब्ध असणारे पाणी अत्यंत काटकसरीने वापरून पुढील वर्षीच्या जून-जुलै पर्यंत पुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोल्हापूर इरिगेशन फेडरेशन आणि जलसंपदा विभाग यांनी पिण्याचे पाणी व खरीप रब्बी पिकांची आवर्तने यासाठी एकत्रित बसून समन्वयाने निर्णय घ्यावा. याबाबतची पहिली बैठक सोमवारीच घ्यावी. शहरांना पाणीपुवठा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सध्याची परिस्थती पाहता शेतकऱ्यांना धीर आणि आधार देण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. पाण्याच्या केलेल्या नियोजनाबाबत त्यांना वस्तूनिष्ठ माहिती देण्याची गरज आहे. त्यासाठी कालवा निरीक्षकांचे संपर्क क्रमांक त्यांना उपलब्ध करुन द्यावेत. यावर्षीच्या एकूण पाण्याचे नियोजन इरिगेशन फेडरेशन, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्रित घेवून समन्वयाने केले जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यावर्षी उन्हाळा तीव्र आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब जपून वापरावा. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय आहे त्यांनी एकवेळ ऊसाचे उत्पादन घेतले तरी चालेल, पण इतरांनी ठिबक सिंचनाशिवाय ऊसाचे उत्पादन घेवू नये.

कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र सात लाख 68 हजार 500 हेक्टर असून त्यापैकी 5 लाख 22 हजार क्षेत्र लागवडी लायक आहे. कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अंतर्गत चार मोठे, बारा मध्यम तर 56 लघु प्रकल्प आहेत‌. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण उपयुक्त पाणी साठा 93.99 अब्ज घनफूट आहे. तर 91.24 अब्ज घनफूट निर्मिती पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पीय सिंचन क्षमता तीन लाख 21 हजार 534 हेक्टर आहे. निर्मित सिंचन क्षमता दोन लाख 88 हजार 261 हेक्टर आहे. उर्वरित सिंचन क्षमता 33 हजार 273 हेक्टर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये केवळ 51.83 टक्के पाऊस झाला आहे. सर्वसा सर्वसाधारणपणे होणाऱ्या 1733.1 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 898.3 मिलिमीटर इतकेच आहे.

Amaron

Amaron

कोल्हापूर जिल्ह्यात 51.83 टक्के, सांगली, जिल्ह्यात 64 टक्के तर सातारा जिल्ह्यात (कराड) 75 टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण भाग हा कृष्णा खोऱ्यामध्ये समाविष्ट असून त्यामध्ये वारणा, कृष्णा, कडवी जांभळी, पंचगंगा, कासारी, कुंभी, धामणी, तुळशी, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, चिकोत्रा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या पूर्ववाहिनी व तिलारी पिश्चम वाहिनी अशा एकूण 17 नद्या व इतर उपनद्या वाहतात. या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील चार मोठे, दोन उपसाचिंन योजना, 12 मध्यम व 56 लघू अशा एकूण 74 प्रकल्पामध्ये निर्मित 91.24 टीएमसी पैकी उपलब्ध 85.13 टीएमसी पाणी साठ्यामधून सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयाप्रमाणे 15 ऑक्टोबर रोजी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून 10 टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा प्रकल्पामध्ये झालेला आहे. परंतु चालू वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने खरीप हंगामामध्ये सिंचनाकरिता आवर्तन द्यावे लागले आहे. त्यामुळे चालू वर्षी प्रकल्पामध्ये सरासरी 95 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठी व भविष्यातील पाणी नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी कपातीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापराबाबत आवाहन करण्यात आले आहे.

वारणा, दुधगंगा, राधानगरी व तुळशी या मोठ्या प्रकल्पांमध्ये 30 ऑक्टोबर 2026 अखेर उपयुक्त पाणी साठा 66.89 टीएमसी (93.95 टक्के) आहे. गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा 0.40 टीएमसी (60 टक्के) तुट आहे. 15 ऑक्टोबर 2026 रोजी उपलब्ध असणाऱ्या पाणी वापराचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

वारणा प्रकल्पातून – रब्बी हंगामासाठी 10.926 टीएमसी पाणीवापर, उन्हाळी हंगामासाठी 10.553 टीएमसी पाणी वापर असा एकूण 21.479 टीएमसी पाणीवापर होणार आहे.
दुधगंगा प्रकल्पातून- रब्बी हंगामासाठी 9.601 टीएमसी पाणीवापर, उन्हाळी हंगामासाठी 9.092 टीएमसी पाणी वापर असा एकूण 18.693 टीएमसी पाणीवापर होणार आहे.
राधानगरी प्रकल्पातून- रब्बी हंगामासाठी 3.85 टीएमसी पाणीवापर, उन्हाळी हंगामासाठी 3.76 टीएमसी पाणी वापर असा एकूण 7.61 टीएमसी पाणीवापर होणार आहे.
तुळशी प्रकल्पातून- रब्बी हंगामासाठी 1.132 टीएमसी पाणीवापर, उन्हाळी हंगामासाठी 1.233 टीएमसी पाणी वापर असा एकूण 2.365 टीएमसी पाणीवापर होणार आहे.
असा एकूण चार मोठ्या प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी 25.509 टीएमसी पाणीवापर, उन्हाळी हंगामासाठी 24.638 टीएमसी पाणी वापर असा एकूण 50.147 टीएमसी पाणीवापराचे नियोजन करण्यात आले आहे.


कोल्हापूर पाटबंधारे मंडळाअंतर्गत 12 तालुके, सांगली जिल्ह्यातील दोन तालुके आणि सातारा जिल्ह्यातील एक तालुका यांच्यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी नियोजन करण्यात आले आहे. एकूण 68 मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा 29.31 टीएमसी आहे. सद्य स्थितीत 27.34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 95.42 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नळ पाणीपुरवठा...