“तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”

करवीर तालुक्यातील ठरावधारक महायुतीच्या नेत्यांवर संतापले: बैठकीत नेत्यांचीच वादावादी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये करवीर तालुक्यातील ठरावधारकांची शपथ घेण्यावरून मतभिन्नता समोर आली. शपथ कुठे घ्यायची यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ठरावधारकांनी “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?, शपथ घेणारच नाही” असा पवित्रा घेत थेट बैठकीतूनच बाहेर पडणे पसंद केले.यामुळे शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ उडाला. करवीर तालुक्यातील ठरावधारकांची कोल्हापूर शहरातील संकल्पसिद्धी हॉल मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा… 

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

या बैठकीस १५० हून अधिक ठरावधारक उपस्थित होते. ठरावधारकांना शपथ देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, मात्र शपथ कुठे आणि कशी घ्यायची, यावरून नेत्यांमध्ये वाद झाला.ठरावधारकांची शपथ सौंदती डोंगरावरील रेणुका देवी इथे जाऊन घेऊ तर शपथ या इथेच घेतल्या जाव्या या मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वादावादी झाली. वाद वाढल्याने अखेर कोणतीही चर्चा निर्णय न होता बैठक गुंडाळावी लागली.नेत्यांमध्येच वादावादी सुरू झाल्याने ठरावधारकांनी “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?,आम्ही शपथ घेणार नाही” अशी थेट भूमिका मांडत ठरावधारक संतप्त झाले.

 

यावेळी माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडताना ठरावधारकांची शपथ ही सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मंदिरात जाऊनच घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली. तर याउलट प्रयाग चिखली येथील रघु पाटील यांनी संकल्प सिद्धी हॉलमध्येच सर्व ठरावधारकांची शपथ उरकून घ्यावी, अशी भूमिका घेतली. माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनीही याला पाठिंबा देत,आमचे ठरावधारक इथेच शपथ घेतील असे ठामपणे सांगितले.

दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका ताणुन धरल्यामुळे नावेद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि रघु पाटील यांच्यात काही काळ जोरदार वादावादी झाली. नेत्यांमधील हा वाद वाढल्याने हॉलमध्ये बैठकीच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला. वातावरण तापल्यामुळे अखेर आयोजित बैठक पूर्ण होऊ शकली नाही. अखेर कोणताही ठोस निर्णय किंवा शपथ न होताच उपस्थित सर्व १५० हून अधिक ठरावधारकांना माघारी फिरावे लागले. मात्र महायुतीमधील गोंधळ आणि ठराव धारकांच्या वर दाखवला जाणारा अविश्वास पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आला. आमच्यावर जर अविश्वास तुमचा असेल तर तुम्हीही संचालक झाल्यानंतर गोकुळ दूध संघात चहा सुद्धा घेणार नाही अशी शपथ घ्या असा राग व्यक्त करत ठराव धारक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले.

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...