महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

रायपूर : सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कथित महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ओमानमधून भारतात आणले आहे. चंद्राकर याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक ओमानला गेले होते. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिली.सीबीआयने अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयातून ही प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण केली. भारत आणि ओमानमधील संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर अटक

सौरभ चंद्राकर याला भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होत्या. इंटरपोलच्या रेड नोटिशीच्या आधारे संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याला काही काळ ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याच महिन्यात भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती; मात्र ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.त्यानंतर इंटरपोलच्या रेड नोटिशीच्या आधारे चंद्राकर याचा माग काढण्यात आला. जूनच्या अखेरीस ओमानची राजधानी मस्कत येथे तो आढळून आला. ओमानच्या रॉयल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ED) चंद्राकर याच्याविरोधातील पुरावे ओमानच्या अधिकाऱ्यांकडे सादर करून प्रत्यार्पणाची औपचारिक मागणी केली. भारत सरकारच्या संबंधित यंत्रणा, इंटरपोलचे राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो आणि ओमानमधील सक्षम अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

ओमान सरकार आणि रॉयल ओमान पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सीबीआयने आभार व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटित गुन्हेगारीविरोधात दोन्ही देशांची सहकार्याची भूमिका या कारवाईतून स्पष्ट झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.या प्रकरणात पोलिस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसह अनेक सार्वजनिक पदांवरील व्यक्तींना कथित लाच दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे चंद्राकर याचे भारतात प्रत्यार्पण होणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही नाव

या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नावही सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. ईडीने दाखल केलेल्या एका आरोपपत्रात सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा केला होता.ऑगस्ट २०२३ मध्ये ईडीने बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या निवासस्थानीही झडती घेतली होती. मात्र, भूपेश बघेल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप वारंवार फेटाळले आहेत.

२०१८ मध्ये महादेव बेटिंग नेटवर्कची स्थापना

सौरभ चंद्राकर हा तिशीच्या सुरुवातीतील असून, त्याने २०१८ मध्ये आपला सहकारी आणि कथित सहसंस्थापक रवी उप्पल याच्यासोबत महादेव बेटिंग नेटवर्क सुरू केले. हे दोघेही छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहेत. बेटिंग व्यवसायात उतरण्यापूर्वी चंद्राकर याचे ज्यूसचे दुकान असल्याचे सांगितले जाते.२०१९ च्या सुमारास हे दोघे दुबईला गेले. तेथून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन बेटिंगचे जाळे उभारल्याचा आरोप आहे. भारतातील लाखो वापरकर्त्यांपर्यंत हे नेटवर्क पोहोचले होते. या व्यवसायाचे प्रवर्तक परदेशात असतानाही विविध वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून बेटिंगचे व्यवहार सुरू असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या नेटवर्कचा सहकारी आणि कथित सहसंस्थापक रवी उप्पल याच्याबाबतही तपास सुरू आहे. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्याविरोधातील प्रत्यार्पणाची कार्यवाही बंद करण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातीतील अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर तो तेथून बेपत्ता झाला होता.

महादेव बेटिंग सिंडिकेटचे कामकाज कसे चालत होते?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बुक हे फ्रँचायझी पद्धतीने चालणारे बेटिंग नेटवर्क होते. देशभरात विविध बेटिंग पॅनेल्स आणि शाखांच्या माध्यमातून त्याचे कामकाज सुरू होते. या प्लॅटफॉर्मवर क्रिकेट आणि इतर खेळांवरील सट्टेबाजी, पोकर, पत्त्यांचे खेळ तसेच अन्य ऑनलाइन गेम्सवर बेटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. टायगर एक्सचेंज, गोल्ड ३६५ आणि लेझर २४७ यांसारख्या विविध प्लॅटफॉर्म्स आणि डोमेन नावांचा वापर केल्याचा आरोप आहे.

Amaron

Amaron

स्थानिक स्तरावर एजंट्सची नियुक्ती करून बेटिंग पॅनेल्स चालवणे, वापरकर्त्यांची नोंदणी करणे आणि बेटिंगचे व्यवहार व्यवस्थापित करणे, अशा पद्धतीने हे नेटवर्क कार्यरत होते.या व्यवहारांतून बेकायदेशीर नफा मिळवण्यात आला आणि तो अनेक बनावट किंवा इतरांच्या नावावरील बँक खात्यांमधून (म्यूल अकाउंट्स) वळवून परदेशात पाठवण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या रकमेतील काही हिस्सा सरकारी अधिकारी आणि इतर सार्वजनिक पदांवरील व्यक्तींना कथित संरक्षण शुल्क म्हणून दिल्याचाही आरोप आहे. ईडीने या प्रकरणातील कथित गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा अंदाज सुमारे ६ हजार कोटी रुपये व्यक्त केला आहे.

दुबईतील २०० कोटींच्या लग्नामुळे प्रकरण चर्चेत

फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबई येथे सौरभ चंद्राकर याने केलेल्या भव्य विवाहसोहळ्यानंतर महादेव बेटिंग प्रकरण देशभरात चर्चेत आले. ईडीच्या दाव्यानुसार, या विवाहसोहळ्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. भारतातून नातेवाईक आणि पाहुण्यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये नेण्यासाठी खासगी विमानांचा वापर करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींना पैसे दिल्याचा आरोपही ईडीने केला. या विवाहसोहळ्यामुळे चंद्राकर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीचा स्रोत तसेच परदेशातील त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी वापरलेल्या पैशांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर ईडीने चंद्राकर, रवी उप्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. मार्च २०२६ मध्ये ईडीने सुमारे १,७०० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली. यामध्ये दुबईतील आलिशान व्हिला आणि उच्चभ्रू अपार्टमेंट्सचा समावेश होता. बुर्ज खलिफामधील मालमत्तांचाही त्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

ईडीचा दावा : दहा वर्षांत ९४,४०० कोटींचे उत्पन्न

महादेव बेटिंग प्रकरणाच्या तपासात सप्टेंबरमध्ये सहावे आरोपपत्र दाखल करताना ईडीने महत्त्वाचे दावे केले. महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप आणि त्याच्याशी संबंधित वेबसाइट्सनी गेल्या दहा वर्षांत कथितरीत्या ९४,४०० कोटी रुपयांचे गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न निर्माण केल्याचे ईडीने म्हटले आहे. मुख्य प्लॅटफॉर्म अद्याप कार्यरत असून मोठ्या संख्येने बेटिंग पॅनेल्स चालवली जात असल्याचाही ईडीचा दावा आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस आणि राजकीय व्यक्तींच्या कथित सक्रिय सहकार्याने हे नेटवर्क चालत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. बेकायदेशीर बेटिंगकडे दुर्लक्ष करण्याच्या बदल्यात नोकरशहा आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींना कथितरीत्या बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळत असल्याचेही ईडीने म्हटले आहे.

 

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाहन हस्तांतरण व बास्केटबॉल मैदान अनावरण सोहळा संपन्न कोल्हापूर : पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी जिल्हा वार्षिक...

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून गावात...

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका १६ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका रोबोटला जप्त केले आहे. फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर या रोबोटने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन...

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

गारगोटीत खळबळ; संशयित प्रियकर स्वतःहून पोलिसांत हजर, चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती कोल्हापूर : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणीला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून दरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यात घडली....

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

कोल्हापूर : शहर आणि परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन सराईत संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जयंती नाला परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. सॅम्युअल दीपक पवार (वय २२, रा. ई. पी. स्कूल कंपाऊंडजवळ, कनाननगर) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय...

चैनीसाठी मुलानेच मारला घरातील १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; शिंगणापूरमध्ये चोरीचा बनाव उघड

कोल्हापूर : महागडा मोबाइल घेण्यासाठी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असल्याने मुलानेच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार शिंगणापूर येथे उघडकीस आला. चोरी झाल्याचा बनाव करून कुटुंबीयांना माहिती देणाऱ्या तरुणाला...