महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.

Amaron

Amaron

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार आहे. 23 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर, 2026 पासून विविध 10 केंद्रांवर तर 65 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर, 2026 पासून आयोजित करण्यात येणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संचालक खेडेकर यांनी केले आहे.

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणजे सळसळते चैतन्य होत्या. वयाच्या नव्वदीतही सादरीकरण करताना त्यांच्यातील ऊर्जा आणि जीवनाविषयीचे प्रेम प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता!

‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता!

पुणे : कोथरूडमधील नवोदित आणि हौशी कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने माझ्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता झाली. या पर्वातील विजेत्या आणि उत्कृष्ट...

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

चंदीगड : चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे जिवंत जाळण्यात आलेली २८ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर सात आठवड्यांची गर्भवती होती, अशी माहिती चंदीगड पोलिसांनी दिली आहे. उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी पीजीआयएमईआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या...

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

मुंबई : रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करताना दिसत आहे. नकारात्मक परीक्षणे, प्रदर्शनाला झालेला विलंब तसेच हिंसक आणि अंतरंग दृश्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांचा कोणताही परिणाम न होता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स...

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपूर येथे लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य...

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

मुंबई: मार्व्हलचा लोकप्रिय सुपरहिरो स्पायडर-मॅन म्हणून टॉम हॉलंडची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 2 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर भारतातही या चित्रपटाची कमाई 500 कोटी रुपयांच्या...