आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणजे सळसळते चैतन्य होत्या. वयाच्या नव्वदीतही सादरीकरण करताना त्यांच्यातील ऊर्जा आणि जीवनाविषयीचे प्रेम प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले, भोसले कुटुंबीय, तसेच चित्रपट, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशाजींचे संपूर्ण आयुष्य हे आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरलेले होते. ज्यांनी आपल्या स्वरांनी अनेक दशकांपासून रसिकांना आनंद दिला, त्यांच्या आठवणी आणि समृद्ध सांगीतिक वारसा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याच भावनेतून तयार करण्यात आलेले ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत त्यांना दिलेली सुंदर स्वरांजली आहे.

“आशाजींचा आवाज ही कधीही न संपणारी अनुभूती आहे. जोपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातील, तोपर्यंत त्या रसिकांच्या मनात कायम राहतील. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन दरवर्षी व्हावे,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी संगीतकार ए. आर. रहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार आणि गीतनिर्मितीशी संबंधित संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, आशा भोसले यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाशी तसेच देश-विदेशातील संगीतप्रेमींशी अतूट नाते होते. त्यांनी मराठीसह विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली. संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत आशाजींना विनम्र अभिवादन असल्याचे सांगितले. “आशाजी या महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या कन्या आहेत. त्यांचा आवाज आणि सांगीतिक वारसा सदैव जिवंत राहील,” असे ते म्हणाले. याप्रसंगी जनाई भोसले यांनी गीताच्या निर्मितीबाबत माहिती दिली. कार्यक्रमात ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून प्रकाशन (रिलीज) व दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने...

‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता!

‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता!

पुणे : कोथरूडमधील नवोदित आणि हौशी कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने माझ्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता झाली. या पर्वातील विजेत्या आणि उत्कृष्ट...

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

चंदीगड : चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे जिवंत जाळण्यात आलेली २८ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर सात आठवड्यांची गर्भवती होती, अशी माहिती चंदीगड पोलिसांनी दिली आहे. उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी पीजीआयएमईआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या...

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

मुंबई : रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करताना दिसत आहे. नकारात्मक परीक्षणे, प्रदर्शनाला झालेला विलंब तसेच हिंसक आणि अंतरंग दृश्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांचा कोणताही परिणाम न होता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स...

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपूर येथे लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य...

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

मुंबई: मार्व्हलचा लोकप्रिय सुपरहिरो स्पायडर-मॅन म्हणून टॉम हॉलंडची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 2 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर भारतातही या चित्रपटाची कमाई 500 कोटी रुपयांच्या...