शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय आहुजा व न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपिठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने नियमानुसार निकालानंतर १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ३ नोव्हेंबरपर्यंत चेअरमन निवड पूर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत विरोधी 12 संचालकांना 2 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

हे ही वाचा… 

जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्समधून ६.३६ अब्ज डॉलरची चोरी; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय

 

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने महायुतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. चेअरमन निवडीच्या बैठकीला महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित का राहिले? असा सवाल करत कोर्टाने उद्याच चेअरमन निवडीची प्रक्रिया का राबवण्यात येऊ नये? अशी विचारणा केली. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांची गुरुवारी निवड केली. मात्र, निवडीसाठी विरोधी आघाडीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवड सभा तहकूब केली होती. त्यामुळे समविचारी आघाडीने गोकुळचे अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकर यांच्यासह 13 संचालकांच्या वतीने ॲड. धैर्यशील पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये शुक्रवारी याचिका दाखल केली. यावर सुनावणी झाली. याचिका कर्त्यांच्यावतीने ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू मांडली. यावेळी ॲड. श्रीकृष्ण गणबावले उपस्थित होते.

हे ही वाचा… 

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 

​महायुतीचे संचालक चेतन नरके यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, आम्हाला आमची बाजू व म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात यावी त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा. यावर कोर्टाने महायुतीच्या सर्व १२ संचालकांना २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहूनच पुढील सर्व प्रक्रिया व निर्णय वैध ठरतील. त्यामुळे कोर्टाच्या या भूमिकेमुळे आणि चेअरमनपद निश्चित होईपर्यंत अशासकीय सदस्यांच्या निवडीला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. आता २ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नळ पाणीपुरवठा...