शरद कोराणे यांच्या मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी करून रवि इंगवले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा : नगरसेविका अर्चना कोराणे

कोल्हापूर : शरद कोरणे यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात समोर आलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे कोराणे कुटुंबियांना धक्का बसला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रविकिरण इंगवले याने शरद कोरणे यांना जेलमध्ये एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन त्यांचा खून केल्याचा तसेच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सम्राट कोराणे यांना प्रकरणात अडकविल्याची कबुली दिली आहे. ज्या अर्थी रविकिरण इंगवले स्वतः म्हणतो, मी शरद कोरणेला एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन जेलमध्ये मारून टाकले. कोणी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत नाही पण रवि इंगवले याने स्वतः कबूल केले आहे. त्यामुळे कोराणे कुटुंबीयांवर अन्याय झाला असून त्या प्रकरणाची सखोल चौकशी  जिल्हा पोलीस प्रमुखांनी करावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना कोराणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हे ही वाचा… 

मनोज जरांगे-पाटील यांचे २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित; मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत

त्या म्हणाल्या की, संपूर्ण कोराणे कुटुंबीय आणि शिवाजी पेठ आमच्या पाठीशी असून आम्ही लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत. कोराणे कुटुंबाला संपवण्याचा विडा त्याने उचलला असल्याचे तो म्हणतो. पण कोराणे कुटुंबाने संपूर्ण शहराला मदतीचा हात दिला आहे. आमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला त्याने ठार मारले, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. रवी इंगवलेवर खुनाचा खटला दाखल करून त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे.


हर्षल सुर्वे म्हणाले की, गेली अनेक वर्षे रवी इंगवलेने शहरातील नागरिकांना ऑडिओ-व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, महिलांचे शोषण करणे, अत्याचार करणे, जागा बळकावणे, लुबाडणे असे अनेक गैरप्रकार केले आहेत.  या सर्वाची चौकशी झालीच पाहिजे.  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण नगरसेविका अर्चना उत्तम कोराने, नगरसेविका मंगलताई साळोखे, नगरसेवक प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, वेताळ तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, श्री वेताळ तालमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले; ६ हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

रायपूर : सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कथित महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ओमानमधून भारतात आणले आहे. चंद्राकर याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक ओमानला गेले होते. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या...

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाहन हस्तांतरण व बास्केटबॉल मैदान अनावरण सोहळा संपन्न कोल्हापूर : पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी जिल्हा वार्षिक...

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

माणगावमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा खून; परिसरात खळबळ

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून गावात...

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

जर्मनीत तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रोबोट जप्त; लैंगिक छळाच्या संशयावरून तपास सुरू

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका १६ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका रोबोटला जप्त केले आहे. फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर या रोबोटने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन...

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय; प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप

गारगोटीत खळबळ; संशयित प्रियकर स्वतःहून पोलिसांत हजर, चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती कोल्हापूर : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणीला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून दरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यात घडली....

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक; २० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

कोल्हापूर : शहर आणि परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन सराईत संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जयंती नाला परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. सॅम्युअल दीपक पवार (वय २२, रा. ई. पी. स्कूल कंपाऊंडजवळ, कनाननगर) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय...